25 वर्षांनी माधुरी दीक्षित-संजय दत्त करतायत 'कलंक'

25 वर्षांनी माधुरी दीक्षित-संजय दत्त करतायत 'कलंक'

या सिनेमामध्ये संजय आणि माधुरी व्यतिरिक्त अजूनही काही मोठे स्टार दिसणार आहेत. आलिया भट्ट, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याही भूमिका असणार आहेत.

  • Share this:

17 एप्रिल : संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांचा साजन किंवा खलनायक सिनेमा तुम्हाला आठवत असेल. बाॅलिवूडचा एक काळ दोघांनी खूप गाजवला. आता 25 वर्षांनी दोघं पुन्हा एकत्र येतायत. 'कलंक'मधून. करण जोहर सिनेमाची निर्मिती करतोय. या सिनेमामध्ये संजय आणि माधुरी व्यतिरिक्त अजूनही काही मोठे स्टार दिसणार आहेत. आलिया भट्ट, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर आणि  सोनाक्षी सिन्हा यांच्याही भूमिका असणार आहेत.

कलंक हा सिनेमा  आहे १९४० च्या काळाच्या जवळपासचा.या सिनेमाबद्दल बोलताना करण जोहर म्हणाला,  'कलंक' माझ्यासाठी एक इमोशनल जर्नी राहिला आहे. कारण १५ वर्षांपूर्वी मला ही सुंदर कल्पना सुचली होती. हा सिनेमा पहिले माझे वडील बनवणार होते पण आता मी खूप खुश आहे की  हा सिनेमा अभिषेक वर्मन दिग्दर्शित करणार आहे.

या सिनेमाचं शूटिंग एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होणार आहे. हा सिनेमा १९ एप्रिल २०१९ मध्ये म्हणजे अजून एका वर्षाने प्रदर्शित होणार आहे.

First published: April 18, 2018, 3:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading