मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sadak-2 Trailer : संजय दत्तच्या आजारपणामुळे पुढे ढकलण्यात आलेला सडक-2 चा ट्रेलर लाँच

Sadak-2 Trailer : संजय दत्तच्या आजारपणामुळे पुढे ढकलण्यात आलेला सडक-2 चा ट्रेलर लाँच

आलिया भट्ट (Alia Bhatt), पूजा भट्ट (Pooja Bhatt), संजय दत्त (Sanjay Dutt) आणि आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) स्टारर 'सडक 2' (Sadak-2)चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे.

आलिया भट्ट (Alia Bhatt), पूजा भट्ट (Pooja Bhatt), संजय दत्त (Sanjay Dutt) आणि आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) स्टारर 'सडक 2' (Sadak-2)चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे.

आलिया भट्ट (Alia Bhatt), पूजा भट्ट (Pooja Bhatt), संजय दत्त (Sanjay Dutt) आणि आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) स्टारर 'सडक 2' (Sadak-2)चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे.

    मुंबई, 12 ऑगस्ट : आलिया भट्ट (Alia Bhatt), पूजा भट्ट (Pooja Bhatt), संजय दत्त (Sanjay Dutt) आणि आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) स्टारर 'सडक 2' (Sadak-2)चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. 11 ऑगस्ट रोजी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र संजय दत्तची कॅन्सरची बातमी समोर आल्यानंतर या सिनेमाच्या ट्रेलर लाँचची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. ट्रेलरमधून आलिया-आदित्यची अर्थात आर्या-विशालची लव्ह स्टोरी या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे, हे स्पष्ट समजते आहे. संजय दत्त रवि नावाच्या एका ट्रॅव्हल एजंटच्या भूमिकेत आहे. या सिनेमामध्ये देखील खलनायकामुळे हिरो-हिरोईनला वेगळे व्हावे लागणार असल्याची पटकथा आहे. अद्याप या ट्रेलरबाबत फार चांगल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत नाही आहेत. एके काळच्या हिट सिनेमाचा सिक्वेल म्हणून सडक-2 चर्चेत आहे. (हे वाचा-आई नर्गिसनंतर संजय दत्तलाही कॅन्सरनं गाठलं; कॅन्सरला फाईट देणारे सेलेब्रिटीज) सडक-2 हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर 28 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. महेश भट्ट यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमामध्ये जिशु सेनगुप्ता, मकरंद देशपांडे, गुलशन ग्रोव्हर, प्रियंका बोस, मोहन कपूर आणि अक्षय आनंद देखील आहेत. एवढी तगडी स्टारकास्ट असताना हा सिनेमा प्रेक्षकांवर जादू करण्यात यशस्वी ठरेल की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Death) बॉलिवूडमध्ये नेपोटिझम या मुद्द्यावरून वादंग निर्माण झाला आहे. नेपोटिझमवरून वाद सुरू असतानाच, स्टार किड्सना देखील सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. त्यांचे चित्रपट न पाहण्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. दरम्यान सडक-2 मधील मूख्य भूमिकेतील सर्वच कलाकार स्टार किड्सपैकी एक आहेत. सुशांतच्या निधनानंतर महेश भट्ट यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगची शिकार व्हावे लागले होते. त्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या मुलींना घेऊन करण्यात आलेल्या या चित्रपटाला रोषाचा सामना करावा लागत आहे. चित्रपटावर बहिष्कार टाकण्याबाबत सोशल मीडियावर चर्चा केली जात आहे. आलियाने या ट्रोल्सना कंटाळून सोशल मीडियावर कमेंट सेक्शन बंद ठेवले आहे. यावरून देखील तिला ट्रोल करण्यात आले होते. (हे वाचा-संजय दत्तचा Lung Cancer तिसऱ्या स्टेजवर; उपचारासाठी तातडीने अमेरिकेला हलवणार) याआधी या सिनेमाची घोषणा झाल्यानंतर महेश भट्ट आणि सिनेमातील कलाकारांना रोषाचा सामना करावा लागला होता. दरम्यान आता ट्रेलर लाँच झाल्यानंतर सिनेमा न पाहण्याची भाषा पुन्हा एकदा सोशल मीडियावर केली जात आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Alia Bhatt, Sanjay dutt

    पुढील बातम्या