संजूबाबाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, स्वॅब रिपोर्टही आला निगेटिव्ह!

संजूबाबाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, स्वॅब रिपोर्टही आला निगेटिव्ह!

बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्तला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

  • Share this:

मुंबई, 09 ऑगस्ट : बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्तला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोरोनाची पहिली चाचणी निगेटिव्ह आली होती. आता स्वॅब चाचणीचा अहवालही समोर आला असून तोही निगेटिव्ह आला आहे.

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच बॉलिवूडमध्ये सिने कलाकारांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलं होतं. त्यातच संजय दत्तला शनिवारी संध्याकाळी अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे तातडीने लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

SSR Death Case: रियाचा भाऊ शोविकची सलग दुसऱ्या दिवशी ED कडून चौकशी

हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर अँटिजन्स चाचणी घेण्यात आली होती. त्यात कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. तरी खबरदारी म्हणून संजय दत्तची स्वॅब टेस्ट घेतली होती. आज सकाळी स्वॅबचा रिपोर्ट आला आहे. यात कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे  आता श्वसनाचा त्रास नेमका का होतो याबाबत डॉक्टर उपचार देत आहेत. संजय दत्तची प्रकृती स्थिर आहे, असंही डॉक्टरांनी सांगितले.

रियाचा भाऊ शोविकची ED कडून 18 तास चौकशी, पहिल्यांदा झाला युरोप दौऱ्याचा उल्लेख

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक व ऐश्वर्या बच्चनसह त्यांची मुलगी आराध्या यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. अमिताभ यांना काही दिवसांपूर्वी घरी सोडण्यात आलं होतं. अभिषेक बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Published by: sachin Salve
First published: August 9, 2020, 9:37 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading