मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /प्रसिद्ध मराठमोळ्या लेखकाचा अपघात; गाडीची भयानक अवस्था, पाहा PHOTO

प्रसिद्ध मराठमोळ्या लेखकाचा अपघात; गाडीची भयानक अवस्था, पाहा PHOTO

 प्राजक्त देशमुख

प्राजक्त देशमुख

मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध लेखक प्राजक्त देशमुख यांच्या गाडीला अपघात झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 03 फेब्रुवारी : मराठी मनोरंजन सृष्टीतुन सध्या एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध लेखक प्राजक्त देशमुख यांच्या गाडीला अपघात झाला आहे.  मुंबई-नाशिक महामार्गावर झालेल्या या अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राजक्त देशमुख हे प्रचंड गाजलेलं नाटक संगीत देवबाभळीचे लेखक आहेत. सध्या त्यांचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत.

प्राजक्तनं सोशल मीडियावर ट्विट करुन ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे. त्याच्या अपघाताची बातमी ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर झालेला हा अपघात एका अवजड वाहनाच्या बेजबाबदार कृतीमुळे झाल्याचे प्राजक्तनं म्हटले आहे. त्याच्या त्या ट्विटनंतर चाहत्यांनी त्याच्यासाठी  काळजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - Milind Gawali : अनिरुद्धच्या पात्राला कंटाळले मिलिंद गवळी? म्हणाले 'हल्ली तो खूपच डोक्यात जातो...'

त्या ट्विटमध्ये प्राजक्तनं म्हटलं आहे की, नाशिक मुंबई हायवे वरुन धावणा-या अवजड वाहने बेशिस्तीने चालतात.भिवंडी फाट्या अलिकडे एका ट्रकने सिमेटचा डिवायडर ब्लॅाक उडवला आणि तो माझ्या गाडीवर आदळला. थोडक्यात बचावलो. मी सुखरुप आहे.परंतू या हायवेला कुणी वाली आहे का? की केवळ स्पिडगन लाऊन दंडाच्या पावत्या ठोकणे इतकंच यांचं काम. असे त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तसेच यावेळी प्राजक्तने चाहत्यांना काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं आहे. ट्विटमध्ये त्याने लिहिलंय कि, 'ट्रकने ब्लॅाक उडवला म्हणजेच तो उजवीकडून चालत होता.अवजड वाहन हायवेला डावीकडून चालणं अपेक्षित असतांना अत्यंत बेजबाबदारपणे हे घडलं. शिवाय ट्रकवाला न थांबता पळून गेला. नशीब बलवत्तर म्हणून वाचलो. नाशिक मुंबई हायवेवर जीव मुठीत धरुन गाड्या चालवा.'

प्राजक्तविषयी सांगायचं तर तो गाजलेल्या 'संगीत देवबाभळी' या नाटकाचा नाटककार आहे. त्याच्या या नाटकावर कित्येक पुरस्काराचा वर्षाव झाला. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. 2017 मध्ये आलेल्या ‘देवबाभळी’ या नाटकाला साहित्य अकादमीच्या युवा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

First published:

Tags: Marathi entertainment