Home /News /entertainment /

सिद्धार्थ चांदेकरचा छोट्या पडद्यावर कमबॅक; सांग तू आहेस का? मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सिद्धार्थ चांदेकरचा छोट्या पडद्यावर कमबॅक; सांग तू आहेस का? मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मराठीतला चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहवर लवकरच सांग तू आहेस का ही मालिका सुरू होणार आहे.

    मुंबई, 23 नोव्हेंबर: अनेक मराठी तरुणींच्या गळातला ताईत असलेला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) लवकरच छोट्या पडद्यावर झळकणार आहे. स्टार प्रवाहवरील (Star Pravah) सांग तू आहेस ना या मालिकेमध्ये सिद्धार्थची मुख्य भूमिका असेल. जीवलगा या मालिकेनंतर बऱ्याच काळाने तो छोट्या पडद्यावर झळकणार आहे. या मालिकेचा जॉनर हॉरर आणि लव्हस्टोरी असा असल्यामुळे प्रेक्षकांना या मालिकेबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. सांग तू आहेस का (Sang Tu Ahes Ka) या मालिकेमध्ये सिद्धार्थसोबत शिवानी रांगोळे, सानिया चौधरी या अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका आहेत. सांग तू आहेस ना या मालिकेसाठी सिद्धार्थ खूपच उत्सुक असल्याचं सांगतो. सिद्धार्थ म्हणतो, ‘उत्तम कथा, चांगला दिग्दर्शक या मालिकेला लाभल्यामुळेच मी हा मालिका करण्यासाठी होकार दिला. विशेष म्हणजे मराठीमध्ये लव्हस्टोरी आणि हॉरर हे दोन जॉनर एकत्र असलेल्या मालिका फारशा नसतात. त्यामुळे या मालिकेत एक वेगळी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळेल हे नक्की. मी सुद्धा कधी भयपटामध्ये काम केलेलं नसल्यामुळे मला एका वेगळया बाजात काम करण्याचा अनुभव मला मिळणार आहे.’ सिद्धार्थची पहिली मालिका देखील स्टार प्रवाहवरचीच होती. अग्निहोत्र या मालिकेत त्याने सुरुवातीला काम केलं होतं. 7 डिसेंबरपासून रात्री दहा वाजता 'सांग तू आहेस का?' मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं दिग्दर्शन दीपक नलावडे यांनी केलं असून निर्मीती विद्याधर पाठारे  यांनी केली आहे. सांग तू आहेस ना? या मालिकेबद्दल बोलताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, त्याचं कथानक अनेक प्रश्न पडत पुढे पुढे सरकणारं आहे. लव्हस्टोरी आणि त्यात गूढ असा या मालिकेचा बाज असल्यामुळे पुढे काय उलगडेल याची हुरहुर सतत मनाला लागून राहील.’
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Marathi entertainment

    पुढील बातम्या