चक्क पाकिस्तानवरून ऋषी कपूर यांना भेटायला गेली अभिनेत्री, लोकांनी केल्या 'या' कमेंट

चक्क पाकिस्तानवरून ऋषी कपूर यांना भेटायला गेली अभिनेत्री, लोकांनी केल्या 'या' कमेंट

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत. आतापर्यंत अनेक बॉलिवूड स्टार त्यांना भेटायला गेले आणि अनेकजण सातत्याने त्यांच्या तब्येतीची चौकशी करत असतात.

  • Share this:

न्यूयॉर्क, 15 जून- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत. आतापर्यंत अनेक बॉलिवूड स्टार त्यांना भेटायला गेले आणि अनेकजण सातत्याने त्यांच्या तब्येतीची चौकशी करत असतात. आता या जवळच्या व्यक्तींमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेनच्या नावाचाही समावेश झाला आहे. मावरा खास ऋषी यांना भेटायला त्यांच्या न्यूयॉर्कमधील राहत्या घरी गेली. ऋषी यांनी स्वतः सोशल मीडियावर तिच्यासोबतचा फोटो शेअर करत ही माहिती दिली. मावरासोबत फोटो शेअर करताना ऋषी यांनी लिहिले की, 'ही पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेत्री मावरा हेकेन (उजवीकडे) आणि तिची मैत्रीण खातिजा आहे. दोघी फार गोड मुली आहेत.' ऋषी यांच्या या फोटोवर अनेक कमेंट येत आहेत.

हेही वाचा- याच कारणामुळे प्रियांका चोप्राच्या दिराच्या बॅचलर पार्टीमध्ये तीनवेळा आले पोलीस

एका युझरने लिहिले की, 'युएसमध्ये इंडो- पाक भेट.' तर दुसऱ्या युझरने लिहिले की, 'ही अभिनेत्री एवढी प्रसिद्ध आहे की तुम्हाला तिच्या नावाचा उल्लेख करावा लागला. फारच छान. ही आहे तरी कोण? आम्ही फक्त तुम्हाला ओळखतो.' यांसारखे संमिश्र कमेंट ऋषी यांचे चाहते या फोटोवर देत आहेत. काही चाहत्यांनी ऋषी यांना लवकर बरे होऊन मायदेशात येण्याच्या शुभेच्छा दिल्या. मावरा होकेनने २०१६ मध्ये आलेल्या सनम तेरी कसम सिनेमात काम केलं होतं. या सिनेमात तिने सरस्वतीची भूमिका साकरली होती. मावरासोबत हर्षवर्धन राणेही या सिनेमात होता.हेही वाचा- Airport Diaries- प्रियांका चोप्रा अमेरिकेला रवाना, यावेळचा लुक होता थोडा वेगळा

गेल्यावर्षी ऋषी हे आपल्या आजारावर उपचार घेण्यासाठी तातडीने न्यूयॉर्कला रवाना झाले होते. सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांनी ट्वीट करत चाहत्यांना आपल्या आजारपणाची माहिती दिली होती. पण त्यांना नेमकी कोणता आजार झाला आहे, याचा खुलासा त्यांनी केला नव्हता. ऋषी यांनी कर्करोगाशी निगडीत आजारावरील उपचारांबद्दल खुलासा केला. काही दिवसांपूर्वी ऋषी यांनी मायदेशात परतण्याची इच्छाही व्यक्त केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, ऋषी यांना त्यांचा वाढदिवस (४ सप्टेंबर) भारतात साजरा करायचा आहे.

World Cup: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यावर पावसाचं ग्रहण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 15, 2019 10:33 AM IST

ताज्या बातम्या