'...मुफ्ती बदनाम हुआ डार्लिंग तेरे लिए' त्या ट्वीटनंतर सना खान होतेय ट्रोल

'...मुफ्ती बदनाम हुआ डार्लिंग तेरे लिए' त्या ट्वीटनंतर सना खान होतेय ट्रोल

सना खानने (Sana Khan) लग्नानंतर नावही बदललं आहे. तिने तिच्या नवऱ्यासोबतचा लग्नाचा फोटो शेअर केला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट कॉमेंट्स केल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 24 नोव्हेंबर: बॉलिवूडला रामराम ठोकल्यानंतर प्रसिद्धीपासून दूर गेलेली अभिनेत्री सना खान (Sana Khan) आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सना खानने नुकतंच मौलाना मुफ्ती अनसशी (Mufti Anas) लग्न केलं. लग्नानंतर सतत वेगवेगळी ट्वीट आणि इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे ती चर्चेत येत आहे. धर्मासाठी बॉलिवूडमधील करिअर सोडणाऱ्या सनाने लग्नानंतर आपलं नावंही बदललं आहे. सनाने आपलं नाव आता सय्यद सना खान असं ठेवलं आहे.

सनाने स्वत:चा आणि तिच्या पतीचा लग्नातला एक फोटो ट्विटरवर शेअर केला. या व्हिडीओला तिने कॅप्शन दिलं की, “‘अल्लाहच्या साक्षीने आम्ही एकमेकांवर प्रेम केलं अल्लाहच्या साक्षीने लग्न केलं आता अल्लाहच आम्हाला आयुष्यभर एकत्र ठेऊदे आणि स्वर्गात पुन्हा आमची भेट होऊदे.” यासोबतच सनाने काही हॅशटॅगही वापरले आहेत. सना खान आणि मौलानाची पहिली ओळख एजाज खानने करुन दिली होती. एजाजदेखील बिग बॉसचा एक स्पर्धक होता.

सनाच्या या ट्वीटवर अनेक चाहत्यांनी वेगवेगळ्या कॉमेंट्स केल्या आहेत. काही जणांनी तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर काहींनी तिची खिल्ली उडवली आहे. एका नेटकऱ्याने लिहीलं आहे की, ‘जर मुफ्ती यांचं नशीब चांगलं असलं तर त्यांना स्वर्गात स्थान मिळेल. नाहीतर मुफ्तीसाहेब नव्या गाण्यामध्ये दिसतील. मुफ्ती बदनाम हुआ डार्लिंग तेरे लिए.’

सना खान बॉलिवूडमध्ये असताना तिच्या आणि कोरिओग्राफर मेल्विन लुईसच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा होत्या. पण त्यांचं ब्रेकअप झालं. तिने त्याच्यावर अनेक आरोपही केले होते.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 24, 2020, 5:42 PM IST

ताज्या बातम्या