सना खानने शेअर केला पतीसोबतचा पहिला PHOTO; या व्यक्तीमुळे झाली होती दोघांची भेट

सना खानने शेअर केला पतीसोबतचा पहिला PHOTO; या व्यक्तीमुळे झाली होती दोघांची भेट

सना खानने (Sana Khan) आपल्या पतीसोबतचा फोटो पहिल्यांदाच शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर: बिग बॉस 6 (Bigg Boss)ची स्पर्धक सना खानने (Sana Khan) शनिवारी गुजरातमध्ये निकाह केला. मौलाना मुफ्ती अनस (Mufti Anas) असं तिच्या नवऱ्याचं नाव आहे. तिच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ती स्वत:च तिचा आणि तिच्या नवऱ्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला काही तासातच 6 लाख 55 हजारांपेक्षा जास्त लाइक्स आले आहेत.

सना खानने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा लहेंगा घातल्याचं दिसत आहे. तर तिच्या पतीने पांढऱ्या रंगाचा कुर्ता - सलवार असा पोषाख परिधान केला आहे. मेहेंदी भरपूर दागिने या वेशामध्ये सना अतिशय सुंदर दिसत आहे. यात सनाने एक खास कॅप्शनही दिलं आहे. सना लिहीते, ‘अल्लाहच्या साक्षीने आम्ही एकमेकांवर प्रेम केलं अल्लाहच्या साक्षीने लग्न केलं आता अल्लाहच आम्हाला आयुष्यभर एकत्र ठेऊदे आणि स्वर्गात पुन्हा आमची भेट होऊदे.’ सना खान आणि मौलानाची पहिली ओळख एजाज खानने करुन दिली होती. एजाजदेखील बिग बॉसचा एक स्पर्धक होता.

सना खानने काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. सिने सृष्टी सोडण्याचा निर्णय घेताना तिने इंन्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये लिहीलं होतं की, मी अनेक वर्षांपासून फिल्मी इंडस्ट्रीमध्ये आयुष्य जगत होते. त्यामुळे मला प्रेक्षकांकडून मान, सन्मान मिळाला आहे. भरपूर पैसाही मी मिळवला आहे. माणसाला कधीही मरण येऊ शकतं आणि मरणानंतर त्याचं काय होईल? या प्रश्नांची उत्तरं मी  फार वर्षांपासून शोधत आहे. विशेषतः मृत्यूनंतर माझं काय होईल याबद्दल मी अधिक विचार करते.' जेव्हा मी धर्मात या गोष्टीचं उत्तर शोधलं तेव्हा मला समजलं की माणसाला मिळालेलं आयुष्य मृत्यूनंतरचं जीवन सुधारण्यासाठी आहे. आणि त्यामुळे मी पैसा आणि प्रसिद्धीपासून दूर जात आहे.’

Published by: Amruta Abhyankar
First published: November 22, 2020, 10:38 PM IST
Tags: bigg boss

ताज्या बातम्या