मुंबई, 23 नोव्हेंबर: गुपचूप लग्न करुन अभिनेत्री सना खानने सर्वांनाच धक्का दिला. मौलाना मुफ्ती अनस (Mufti Anas) असं तिच्या नवऱ्याचं नाव आहे. तिच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिने स्वत:च तिचा आणि तिच्या नवऱ्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला काही तासातच 6 लाख 55 हजारांपेक्षा जास्त लाइक्स आले होते. सुरूवातीच्या काळात अतिशय बोल्ड असणाऱ्या या अभिनेत्रीने धर्मासाठी इंडस्ट्रीतलं करिअर सोडून दिलं. त्यावेळी तिने स्वत:चे जुने बोल्ड कपड्यातले फोटोही डिलीट केले होते. स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिने ही माहिती दिली. आता तिच्या चाहत्यांना आणखी एक झटका बसणार आहे. लग्नानंतर सनाने स्वत:चं नावही बदललं आहे.
अभिनेत्रीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चं नाव बदललेलं दिसत आहे. सनाचं नाव आता सय्यद सना खान असं दिसत आहे. सनाने रविवारी तिच्या नवऱ्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. फोटोमध्ये तिने लाल रंगाचा लहेंगा घातला होता. तर तिच्या पतीने पांढऱ्या रंगाचा कुर्ता - सलवार असा पोषाख परिधान केला होता. मेहेंदी, भरपूर दागिने या वेशामध्ये सना अतिशय सुंदर दिसत होती. सना खानची आणि तिच्या पतीची ओळखही इंडस्ट्रीतल्या एका व्यक्तीने करुन दिली होती. एजाज खानने पहिल्यांदा या दोघांची ओळख करुन दिली होती.
सलमान खानच्या सिनेमात केलं होतं काम
बिग बॉस 6 मध्ये सनाचा खेळ अनेकांना आवडला होता. सलमान खानचीही ती आवडती स्पर्धक होती. अभिनेत्री सना खानने सलमान खानच्या जय हो चित्रपटातही भूमिका केली होती.