'किशोरवयात मला कुणी स्वतःवर प्रेम करायला शिकवलं असतं तर...' अभिनेत्रीनं शेअर केला हा फोटो

या अभिनेत्रीनं लहानपणचा लठ्ठ असतानाचा फोटो शेअर करताना म्हटलंय... सगळं बालपण वजन कमी करण्याच्या स्ट्रेसमध्ये गेलं.

या अभिनेत्रीनं लहानपणचा लठ्ठ असतानाचा फोटो शेअर करताना म्हटलंय... सगळं बालपण वजन कमी करण्याच्या स्ट्रेसमध्ये गेलं.

  • Share this:
    मुंबई, 25 जुलै : कुठलीही अभिनेत्री आपले कुठले फोटो सोशल मीडियावर येतायत याबाबत जागरुक असते. लहानपणचा, बिनामेकअपचा कसाही फोटो सोशल मीडियावर येऊ नये म्हणून त्या काळजी घेत असाव्यात, पण ही अभिनेत्री मात्र त्याला अपवाद दिसतेय. आपला लहानपणचा, जाड असतानाचा फोटो शेअर करून एक डोळे उघडायला लावणारी पोस्टही या अभिनेत्रीनं लिहिली आहे. आम्ही बोलतोय समीरा रेड्डी Sameera Reddy बद्दल. आजकाल समीरा सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह आहे. तिचं प्रेग्नंट असताना केलेलें अंडरवॉटर फोटो शूट गाजलं होतं. काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा आई झाली. मुलीच्या जन्मानंतर समीरानं तिच्या इन्स्टाग्रामवर मुलीसोबतचा फोटो सुद्धा शेअर केला होता. याशिवाय तिनं मुलीच्या जन्माची गोड बातमी सुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली होती. आज तिने स्वतःचा लहानपणचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला आहे. किशोरवयात आपल्याला कुणी का स्वतःवर, स्वतःच्या शरीरावर प्रेम करायला शिकवलं नाही? अशी खंत तिने या पोस्टमधून व्यक्त केली आहे. ‘सेक्स’वर बोलणार सोनाक्षी सिन्हा, ट्विटरवर शेअर केला नंबर सगळं लहानपण आपण लठ्ठ आहोत, आपल्याला बारिक व्हायला हवं, या न्यूनगंडातून बाहेर येण्यात आणि वजन कमी करण्याचं प्रेशर घेऊन जगण्यात गेलं, असंही तिने लिहून टाकलंय. 'मी तेव्हा 13 वर्षांची होते. वर्गात सर्वात उंच होते आणि सगळ्यात ऑकवर्डही.' असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. समीरा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिने नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट केली, तीसुद्धा गाजली होती. तिनं बाळंतपणानंतर येणाऱ्या समस्यांविषयी लिहिलं आहे. तसंच बाळाच्या जन्मानंतर त्याला ब्रेस्टफीडिंग करताना आईला काय काय समस्या येतात याविषयी तिनं या पोस्टमधून आपलं मतं मांडलं आहे.
    समीरा तिच्या गरोदरपणात खूपच उत्साही दिसली होती. तिनं अनेकदा बेबी बंपचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यानंतर आई झाल्यावरही तिनं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून तिचा दुसऱ्यांदा आई होण्याचा अनुभव शेअर केला. आपल्या लेटेस्ट पोस्टमध्ये समीरानं सांगितलं की, नुकत्याच जन्मलेल्या बाळाला दूध पाजणं (ब्रेस्ट फिडिंग) किती अवघड असतं. समीरा रेड्डीनं नवव्या महिन्यात केलेलं हे अंडरवॉटर शूटही गाजलं होतं. मुलगी जन्मल्यानंतर समीरा रेड्डीची भावुक पोस्ट, ब्रेस्टफिडिंगबद्दल म्हणाली... मुलीच्या जन्मानंतर समीराची ही पहिली पोस्ट नाही. याआधी समीरानं तिच्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर करत त्याला, मी मुलीच्या जन्मानंतर खूप खूश आहे. शरीरात अनेक बदल होत असल्यानं हार्मोनलमुळे मला मी ठीक असल्यासारखं वाटत नाही. पण हे सर्व लवकरच ठीक होईल आणि हा विचार करून आपल्याला पुढे जावं लागतं. 2015 मध्ये समीरा पहिल्यांदा आई झाली होती. तिला चार वर्षांचा एक मुलगा आहे. VIDEO : लेफ्टनंट कर्नल धोनी लष्करात निभावणार ही जबाबदारी, संध्याकाळच्या 18 सुपरफास्ट बातम्या
    Published by:Arundhati Ranade Joshi
    First published: