समीराने शेअर केला मुलीचा पहिला फोटो आणि भावुक होऊन लिहिली ही पोस्ट

तिला माहीत होतं की मी हरवले आहे आणि हिनेच मला रस्ता दाखवला. आई होऊन मी माझा आवाज परत मिळवला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2019 04:52 PM IST

समीराने शेअर केला मुलीचा पहिला फोटो आणि भावुक होऊन लिहिली ही पोस्ट

बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. समीराने सुरुवातीला मुलीचा आणि तिच्या हाताचा फोटो शेअर करून तिला मुलगी झाल्याची गोड बातमी दिली होती. यानंतर आता समीराने मुलीला हातात घेतलेला फोटो शेअर केला आहे.

या फोटोला कॅप्शन देताना समीराने लिहिले की, ‘या छोट्याशा मुलीने मला जंगलातील घोड्याप्रमाणे शक्ती दिली आहे. हिच्यामुळे मी स्वतःला नव्याने शोधू शकले. तिला माहीत होतं की मी हरवले आहे आणि हिनेच मला रस्ता दाखवला. आई होऊन मी माझा आवाज परत मिळवला आहे.’

समीरा पुढे म्हणाली की, ‘मी त्या सर्वांचे आभार मानते, ज्यांनी मला पाठिंबा दिला. आम्ही मुलगी होण्यासाठीच देवाकडे प्रार्थना केली होती. आम्हाला मुलीच्या रुपातच आशीर्वाद मिळाला.’

समीराने गरोदरपणातला काळ पूर्ण एन्जॉय केला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तिने नवव्या महिन्यात अंडरवॉटर फोटोशूटही केलं होतं. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

याशिवाय समीराने गरोदरपणातले अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करून या दिवसांमधला अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला होता. सध्या समीराला अभिनंदनाचे अनेक मेसेज येत आहेत.

Loading...

समीराने २०१४ मध्ये व्यावसायिक अक्षय वर्देशी लग्न केलं. २०१५ मध्ये ती एका मुलाची आई झाली. आता समीरा दुसऱ्यांदा आई झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 16, 2019 04:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...