Breastfeeding Week मध्ये समीरा रेड्डीने शेअर केला व्हिडिओ, मिळाल्या अशा कमेंट

Breastfeeding Week मध्ये समीरा रेड्डीने शेअर केला व्हिडिओ, मिळाल्या अशा कमेंट

तिने शेअर केलेले प्रत्येक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेकदा तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं.

  • Share this:

मुंबई, 03 ऑगस्ट- बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली. प्रेग्नंसी दरम्यान समीर सोशल मीडियावर फार सक्रिय होती. डोहाळ जेवणापासून ते प्रेग्नंसी शूटपर्यंतचे सगळे अपडेट ती इन्स्टाग्रामवर शेअर करत होती. मुलगी झाल्यानंतरही तिने मुलीसोबतचे फोटो शेअर केले. तिने शेअर केलेले प्रत्येक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेकदा तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. पण तरीही तिने आपलं मत आणि आपल्या भावना सतत व्यक्त केल्या. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून तिने एक महत्त्वपूर्ण मेसेजही दिला आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओसाठी समीराचं कौतुकही होत आहे.

समीराने वर्ल्ड ब्रेस्टफीडिंग वीकवर मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला. यानंतर तिने फक्त आईंसाठीच नाही तर बाबांसाठीही एक महत्त्वाचा संदेश दिला. तिने या फोटोसोबत लिहिले की, 'नव्याने पितृत्वाच्या जबाबदारी स्वीकारलेल्या बाबांनो हा वर्ल्ड ब्रेस्टफीडिंग वीक आहे. ही पोस्ट तुम्हाला हे सांगण्यासाठी आहे की तुम्ही तुमच्या मुलांच्या आईचे सर्वात महत्त्वाचे पाठिराखे आहात.'

 

View this post on Instagram

 

#worldbreastfeedingweek August 1st to 7th #awareness #breastfeeding #newmom #keepingitreal @waba_global @who @unicefindia #wbw2019

A post shared by Sameera Reddy (@reddysameera) on

समीरा पुढे म्हणाली की, 'एक आई नैराश्यग्रस्त होऊ शकते. तिच्यात आत्मविश्वासाची कमतरता असू शकते. ती तणावातही असू शकते. याचा परिणाम ब्रेस्टफीडिंगवर होऊ शकतो. या सर्व गोष्टी मिल्क प्रोडक्शनवर सरळ परिणाम करत नसल्या तरी मुलासाठीच्या तिच्या प्रतिक्रियेमध्ये बदल येऊ शकतात. यामुळे मूल कमी दूध पिऊ शकतं आणि मिल्क प्रोडक्शनची समस्याही निर्माण होऊ शकते. त्यामुळए तुम्ही पत्नीची साथ कधीही सोडू नका.'

यासोबत समीराने एक व्हिडिओ शेअर केला. यात ती म्हणाली की, ती या ब्रेस्टफीडिंग वीकला अनेक व्हिडिओ आणि पोस्टच्या मार्फत आई- वडिलांच्या संपर्कात राहील आणि या विषयाशी संबंधीत अनेक महत्त्वाच्या गोष्टी शेअर करेल. समीराशिवाय नेहा धुपियानेही वर्ल्ड ब्रेस्टफीडिंग वीकला एक कँपेन लॉन्च केलं. 

हॉटेलमधून शॅम्पूच्या बाटल्या चोरायची दीपिका, बेस्ट फ्रेंडने सांगितलं गुपित

करण जोहरच्या 'ड्रग पार्टी'विरोधात आमदाराने लिहिलं Open Letter

बॉलिवूडच्या या 5 कपल्सनी सर्वांसमोर दिली होती नात्याची कबुली

विद्या बालनच्या आयुष्यात नवी 'कहाणी' पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2019 02:34 PM IST

ताज्या बातम्या