एक दिवस आधीच शेअर केला होता व्हिडिओ, आता 'ही' अभिनेत्री झाली आई

एक दिवस आधीच शेअर केला होता व्हिडिओ, आता 'ही' अभिनेत्री झाली आई

ही अभिनेत्री दुसऱ्यांदा आई बनली असून तिला कन्यारत्नाचा लाभ झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : मागच्या बऱ्याच काळापासून प्रेग्नन्सीमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री समीरा रेड्डीला नुकताच कन्यारत्नाचा लाभ झाला असून समीराच्या आईनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसंच बाळ आणि आई दोघंही सुखरूप असल्याचं त्यांनी सांगितलं. बीम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, खार येथे मध्ये समीराची डिलिव्हरी झाली आहे. काल रात्री समीराला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज सकाळी तिला गोंडस मुलीला जन्म दिला. तिनं आपल्या मुलीचा पहिला फोटो सुद्धा तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Our little angel came this morning 🌸My Baby girl ! Thank you for all the love and blessings ❤️🙏🏻 #blessed

A post shared by Sameera Reddy (@reddysameera) on

समीरा रेड्डी प्रेग्नन्सीच्या काळात सोशल मीडियावर फार सक्रिय होती. तिनं आपल्या प्रेग्नंसी, बॉडी शेमिंगवर मनमोकळेपणाने मतं मांडली होती. समीराचे प्रेग्नंसीमधील अनेक फोटो व्हायरल झाले होते. दरम्यान तिने बेबी शॉवरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. तसेच तिनं काही अंडर वॉटर फोटोशूटचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. तसेच नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ती नो मेकअप लुकमध्ये दिसली.यातून तिनं प्रेग्नंट वूमनसाठी खास मेसेज दिला होता.

कंगना रणौतच्या वकिलाकडून पत्रकाराला नोटीस, बहीण रंगोलीनं केलं 'हे' ट्वीट

समीरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ती नो मेकअप लुकमध्ये दिसली. समीरानं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘ही आहे रिअल मी, मला माहीत आहे यावर लोक टीका करतील मात्र मी कोणीही मला काय बोलतं याला घाबरत नाही. मी तुम्हाला दाखवू इच्छिते की, मी विना मेकअप आणि सकाळी उठल्यावर माझा चेहरा कसा असतो आणि हे सर्व सेलिब्रेट करायला मला खूप आवडतं.’ समीराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

आता अनुष्काच्या मागे लागले युझर, सुई धागाच्या जाळ्यात अडकला विराट कोहली

काही दिवसांपूर्वी तिने अण्डरवॉटर फोटोशूट केलं. फोटोमध्ये समीराने बिकीनीमध्ये अनेक बोल्ड पोज दिल्या होत्या. तिने यावेळी बेबी बंप फ्लॉन्ट केलाच शिवाय संपूर्ण फोटोशूटमध्ये ती फारच सुंदर दिसत होती. समीराचे हे अंडरवॉटर फोटो लोकाच्या पसंतीत उतरले होते.

Bigg Boss Marathi 2 : त्या पांढऱ्या पँटवरून होणार का बिग फाईट?

अनेकांनी या फोटोंवर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र तर काहींनी ‘आता हेच करायचं राहिलेलं…’ अशाही कमेंट दिल्या. तर काहींनी बाळाला रिस्कमध्ये टाकू नको अशा सुचनाही दिल्या. याआधी कोणत्याही अभिनेत्रीने नवव्या महिन्यात पाण्यात जाऊन फोटोशूट केलं नव्हतं. समीराने २०१४ मध्ये व्यावसायिक अक्षय वर्देशी लग्न केलं. २०१५ मध्ये ती एका मुलाची आई झाली. आता समीरा दुसऱ्यांदा आई झाली आहे.

========================================================

VIDEO: विठुरायाच्या दरबारात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 03:50 PM IST

ताज्या बातम्या