Home /News /entertainment /

समीरवर चढणार यश नेहाच्या हळदीच्या रंग; दारुच्या नशेत शेफालीला करणार प्रपोज

समीरवर चढणार यश नेहाच्या हळदीच्या रंग; दारुच्या नशेत शेफालीला करणार प्रपोज

समीरवर चढणार यश नेहाच्या हळदीच्या रंग; दारुच्या नशेत शेफालीला करणार प्रपोज

समीरवर चढणार यश नेहाच्या हळदीच्या रंग; दारुच्या नशेत शेफालीला करणार प्रपोज

नेहा यशच्या लग्नात शेफाली आणि समीर यांची लव्ह स्टोरी फुलत असल्याचं आपण पाहतोय. नेहा यशची हळद शेफाली आणि समीरसाठी लकी ठरणार आहे.

  मुंबई, 09 जून: झी मराठीवर (Zee Marathi) सध्या एकाच मालिकेची चर्चा आहे ती म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'ची ( Majhi Tujhi Reshimgath) नेहा (Neha)  आणि यश (Yash)  यांच्या लग्न विधींना सुरुवात झाली आहे. दोघांच्या घरी लगीन घाई सुरू आहे. त्यात परी तर आईच्या लग्नात फारच उत्साही आहे. परीनं स्वत: जाऊन सर्वांच्या आईच्या लग्नाच्या पत्रिका वाटल्यात. नेहा आणि यश यांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. मालिकेत सध्या नेहा आणि यश यांची हळद सुरू आहे.  नेहा यशच्या हळदीत सगळेच धम्माल करणार आहेत.  पण नेहा यशच्या हळदीचा खरा रंग शेफाली आणि समीरवर (Sameer Shefali)  चढणार आहे. समीर चक्क शेफालीला आय लव्ह यू म्हणणार आहे. मालिकेत सध्या नेहा यशची हळद रंगणार आहे.  आपल्या लाडक्या मित्राच्या हळदीत समीर देखील दणकून धम्माल करणार आहे. समीर आणि मित्र मंडळी दारू पिऊन पार्टी करतात आणि हळदीचा हँगओव्हर घेऊन समीर थेट शेफालीला तिच्या मनातील भावना सांगणार आहे. मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झालाय. ज्यात समीर दारूच्या नशेत शेफालीला आय लव्ह यू म्हणतो.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  गेली अनेक दिवस शेफाली ज्या दिवसाची वाट पाहत होती. तो दिवस अखेर आल्यानं म्हणजेच समीरनं शेफालीला आय लव्ह यू म्हटल्यानं शेफालीचा आनंद गगनात मावेनासा होणार आहे.  शेफाली आनंदाच्या भरात वेडी होऊन तो क्षण सर्वांना सांगणार आहे. पण समीरनं तिला  दारूच्या नशेत प्रपोज केलं हे काही शेफालीला माहिती नाही. तसंच समीरलाही आपण आपल्या मनातील भावना शेफालीला सांगितल्याचं माहिती नाही. त्यामुळे समीर शेफाली एकमेकांसमोर आल्यानंतर काय धम्माल उडणार हे पाहणे मजेशीर ठरणार आहे. हेही वाचा - ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देतेय महिमा चौधरी, अनुपम खेर यांनी शेअर केला इमोशनल VIDEO शेफाली आणि समीर गेली अनेक दिवस एकमेकांच्या जवळ आल्याचं दिसत आहे. नेहा आणि यशच्या लग्नामुळे दोघांच्या रेशीमगाठी उत्तमरित्या जुळून आल्यात. पण आता झालेला गोंधळ दोघं कसे निस्तरणार हे पाहण्यासाठी सगळ्यांच्या उत्सुकता वाढल्या आहेत. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत यश आणि नेहा यांचा शाही विवाहसोहळ्याचा 2 तासांचा विशेष भाग 12 जून रोजी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तुला पाहते रे मालिकेप्रमाणे भव्य दिव्य लग्नसोहळा पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. नेहा आणि यशच्या लग्नातील व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या