अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत सध्या न्यायनिवाडा सुरू आहे. लवकरच संभाजी महाराज आणि सोयराबाई यांची भेट होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 17, 2019 11:38 AM IST

अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत सध्या सदरेवर न्यायनिवाडा सुरू आहे. शंभूराजे प्रत्येक आरोपीला प्रचंड रागानं सुनावतायत.

अनाजी पंत, सोमाजी यांचाही न्यायनिवाडा सुरू आहे. सोमाजी हा बाहेरचा माणूस. त्यानं स्वराज्यात काहीही पद नसताना इतकी ढवळाढवळ केली म्हणून शंभूराजे भडकतात.

शिवाजी महाराजांचं देहावसान होताना शेवटी त्यांनी शंभूराजेंचं नाव घेतलं, हेही त्यांना कळतं. त्यामुळेच आता ते न्यायनिवाडा अधिकारानं करत आहेत.

Loading...

शंभूराजेंच्या पाठी हंबीरमामा खंबीरपणे उभे राहिलेत. त्यांच्या मते तर या निवाड्याची गरजच नाही. प्रत्येकाला शिक्षा झालीच पाहिजे.

संभाजी महाराजांनी न्याय निवाडा तर सुरू केलाय, पण अजून कोणाला शिक्षा सुनावली नाहीय.

या सर्व कटाच्या म्होरक्या सोयराबाई असल्याचं सगळ्यांना माहीत आहे.

सोयराबाई आणि संभाजी महाराज यांची तशी भेट अजून झालेली नाही. त्याआधी येसुबाईंनीही ही भेट व्हावी म्हणून प्रयत्न केले होते.

संभाजी महाराजांच्या बहिणीनं तर सोयरा मातोश्रींना चार बोल सुनावले होते.

प्रेक्षक वाट पाहतायत ती संभाजी महाराज आणि सोयरा मातोश्री यांच्या भेटीची. तो क्षण या आठवड्यात येणार आहे.

आतापर्यंत सोयराबाई आणि संभाजी महाराज आमनेसामने आले होते. पण दोघांची भेट तशी झाली नव्हती. ती उत्सुकता आता लवकरच संपणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2019 11:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...