मुंबई, 15 जानेवारी - दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही फिटनेस फ्रीक (Fitness Freak) असून, आपलं रूटिन ती कसोशीनं फॉलो करते. आता हे आम्हाला कसं कळलं? तर तुम्हीच पाहा तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलची ही झलक म्हणजे तुम्हालाही कळेल की, ती किती फिटनेस फ्रीक आहे ते. कारण अशी समंथासारखी फिगर मिळवणं हे सोपं नक्कीच नाही. हे तिच्या लेटेस्ट इन्स्टास्टोरीजवरून सिद्ध झालं आहे.
समंथाने शुक्रवारी संध्याकाळी तिच्या हार्ड वर्कआऊट ट्रेनिंगचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्यामध्ये ती तब्बल 80 किलोचं वेटलिफ्टिंग करताना दिसत आहे. हो... तब्बल 80 किलोचं वजन समंथाने संपूर्ण ताकत लावून उचललं आहे.
समंथाने या आधीही अनेकदा आपल्या वर्कआऊट सेशनची झलक दाखवली आहे. समंथा नेहमीच आपल्या जिम ट्रेनिंगचे व्हिडिओ आणि स्टोरीज शेअर करत असते. या आधीही समंथाने तिच्या फॅन्सना लेव्हल अप फिटनेस चॅलेंज देऊन फिटनेससाठी प्रोत्साहित केलं होतं. समंथाच्या या फिटनेस व्हिडिओचं खूप कौतुक करण्यात आलं होतं. यूजर्सनी तिला ‘शक्तीशाली महिला’, ‘थलाईवी’ अशा कॉम्प्लिमेंट्स दिल्या होत्या
समंथाच्या कामाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, नुकत्याच आलेल्या अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर पुष्पा : द राईज - पार्ट 1 (Pushpa : The Rise - Part 1) या चित्रपटातील तिच्या स्पेशल डान्स साँगसाठी तिला भरपूर वाहवा मिळत आहे. वेबसीरिज फॅमिली मॅन 2 मधील तिच्या अभिनयाचंही क्रिटिक्स आणि चाहत्यांनी कौतुक केलं होतं. आगामी शाकुंतलम (Shaakuntalam) चित्रपटाचं शूटिंगही समंथाने पूर्ण केलं आहे. एका ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सीरिजमध्ये ती वरुण धवनसोबत काम करत आहे.
खासगी आयुष्यामुळे समंथा गेले काही दिवस सतत चर्चेत आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये ती आणि अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitnya) यांचं लग्न तुटल्याचं आणि ते दोघं विभक्त झाल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं होतं. फिल्म कंपॅनियन आयोजित ‘रेट्रोस्पेक्टिव्ह ऑन 2021’ च्या बेस्ट परफॉर्ममन्सरमध्ये आलेली असताना, समंथाने विभक्त होण्याच्या पार्श्वभूमीवर तिच्या भावनिक अनुभवांबद्दल सांगितलं होतं.
या कार्यक्रमात बोलतान समंथा म्हणाली की, "माझ्या आयुष्यात 2021 सालांत जे काही घडलं, ते मला अजिबातच अपेक्षित नव्हतं. मी जे काही प्लॅन्स केले होते, ते सर्व कोलमडले. आता मला काहीच अपेक्षा नाहीत. भविष्यात जे काही घडेल, त्यासाठी मी तयार आहे. मी माझ्यापरीने उत्तम तेच करेन.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Entertainment