मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'पुष्पा'ची आयटम गर्ल समांथा प्रभूला झाला गंभीर आजार; उपचारासाठी गाठलं अमेरिका

'पुष्पा'ची आयटम गर्ल समांथा प्रभूला झाला गंभीर आजार; उपचारासाठी गाठलं अमेरिका

Samantha Ruth Prabhu

Samantha Ruth Prabhu

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. समांथा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून तिचे चाहते तिला बॉलिवूडमध्ये पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 20 सप्टेंबर : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. समांथा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून तिचे चाहते तिला बॉलिवूडमध्ये पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. मात्र काही दिवसांपासून समांथा सोशल मीडियापासून दूर आहे. ती सध्या एका वेगळ्याच अडचणीत सापडल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून समांथाची तब्येत ठीक नसून ती एका गंभीर आजाराने त्रस्त आहे.

गेल्या काही दिवसांपासून समांथाची तब्येत ठीक नाहीये. प्रकृती अस्वास्थ्यामुळे समांथाने शूटिंगमधून ब्रेक घेतला असून उपचारासाठी ती अमेरिकेत गेली आहे. ती 'पॉलीमॉर्फ्स लाइट एरप्शन' या आजाराशी ग्रासलेली आहे. हा आजार त्वचेशी संबंधीत आहे. हा रोग सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कामुळे त्वचेवर होतो. यामुळे समंथा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाही.

हेही वाचा -  VIDEO : साराच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत करण हे खुलेआम काय बोलून गेला? अभिनेत्रीलाही वाटली लाज

समांथा सध्या 'खुशी ' या चित्रपटाचं शुटिंग करत आहे. या चित्रपटात ती विजय देवरकोंडासोबत झळकणार आहे. मात्र सध्या समांथाने या शूटिंगमधून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे तिचे चाहते सध्या चिंतेत आहेत.

दरम्यान,  'पॉलीमॉर्फ्स लाइट एरप्शन' हा दुर्मिळ आजार आहे. समांथाच्या पहिलेही काही कलाकारांनी या आजाराशी सामना केला आहे. यामध्ये सलमान खान आणि इरफान खान यांचा समावेश आहे. सहसा ज्यांना सूर्यप्रकाशात चालण्याची सवय नसते, त्यांना सूर्याच्या थेट संपर्कात आल्यावर खाज सुटू लागते. या खाजमुळे त्वचेवर डाग येऊ लागतात. डागांसह, एखाद्या व्यक्तीला वेदना देखील होतात. सलमान खाननेही अमेरिकेत जाऊन आपल्या आजारावर उपचार केले.

First published:

Tags: Bollywood, Skin, South actress, South film