• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Samantha सोबत अफेयर्सच्या चर्चांवर प्रीतमची पहिली प्रतिक्रिया! केला मोठा खुलासा

Samantha सोबत अफेयर्सच्या चर्चांवर प्रीतमची पहिली प्रतिक्रिया! केला मोठा खुलासा

अभिनेत्री समंथा प्रभूचा स्टायलिस्ट आणि मित्र प्रीतम जुकलकर (Preetham Jukalker) यांच्यातील वाढती जवळीकता हे नागा चैतन्य आणि समंथाच्या घटस्फोटचं एक कारण असल्याचं म्हटलं जात आहे.

 • Share this:
  मुंबई, 14ऑक्टोबर- साऊथ सिनेसृष्टीतील(South Industry) सर्वात रोमॅंटिक कपल म्हणून अभिनेत्री समंथा (Samantha) आणि नागा चैतन्य(Naga Chaitanya) यांच्या जोडीला ओळखलं जात असे. मात्र या दोघांनी घटस्फोट घेत सर्वानांच धक्का दिला आहे. तब्बल ८ वर्षे रिलेशनशिप आणि नंतर लग्न अशी लव्हस्टोरी असणाऱ्या या कपलने अवघ्या चार वर्षातच काडीमोड घेतला ही गोष्ट अजूनही अनेकांना पटणं कठीण आहे. दरम्यान समंथावर अनेक आरोप लावले जात आहेत. तिच्याबाबतीत सोशल मीडियावर अनेक आहेत. यातच तिचा स्टायलिश प्रीतम जुकलकर (Preetam Jukalker) याच्यासोबत समंथाचं अफेयर असल्याचं म्हटलं जात आहे. आता यावर स्वतः प्रीतमने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
  अभिनेत्री समंथा प्रभूचा स्टायलिस्ट आणि मित्र प्रीतम जुकलकर (Preetham Jukalker) यांच्यातील वाढती जवळीकता हे नागा चैतन्य आणि समंथाच्या घटस्फोटचं एक कारण असल्याचं म्हटलं जात आहे. प्रीतम आणि समंथा हे दोघेही चांगले मित्र आहेत. तसेच सोशल मीडियावर असलेल्या फोटोंमधून त्यांची जवळीकता दिसून येते. त्यामुळे अनेकांना या दोघांमध्ये काहीतरी असल्याचं वाटत. दोघेही सतत एकमेकांसोबत फोटो शेअर करत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या या दोघांचं अफेयर असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. मात्र या प्रकरणावर अभिनेत्रीने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (हे वाचा:अखेर समंथा आणि नागा चैतन्यने घेतला घटस्फोटचा निर्णय! अभिनेत्रीने ... ) तत्पूर्वी समंथाचा मित्र आणि स्टायलिस्ट प्रीतम जुकलकरने आपल्या आणि समंथाच्या अफेयरच्या चर्चानां उत्तर दिलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत प्रीतमने म्हटलं आहे, 'प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे, मी समंथाला 'जिजी' असं संबोधतो आणि या साऊथ इंडियन शब्दाचा अर्थ 'बहीण' असा होतो. मग मी तिला बहीण म्हणूनच बोलवत असताना आमच्यामध्ये अफेयर होणं कसं शक्य आहे?' असं म्हणत प्रीतमने आपल्या दोघांमध्ये काहीही नसून या निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. (हे वाचा:'ही' व्यक्ती आहे समंथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटचं कारण? जाणून ... ) काही काळापूर्वी, प्रीतम जुकलकरनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. संमथाच्या सासरची मंडळी तिचा छळ करत असल्याच्या आशयाची ती पोस्ट होती. नंतर ती हटवण्यात आली. मात्र, त्यापूर्वीचं अनेकांनी ती वाचल्यानं सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं.नागा चैतन्य आणि समंथा या सुपरस्टार जोडप्याच्या विभक्त होण्याची बरीच कारणं सोशल मीडियावर सांगितली जात आहेत.त्यावर चर्चा देखील होत आहेत. परंतु, अद्याप दोघांनी यातील एकाही कारणाला दुजोरा दिलेला नाही.
  Published by:Aiman Desai
  First published: