Home /News /entertainment /

सलमान खानच्या आगामी चित्रपटात झळकणार साऊथ अभिनेत्री; समंथा, रश्मिका,पूजा दिसणार एकत्र?

सलमान खानच्या आगामी चित्रपटात झळकणार साऊथ अभिनेत्री; समंथा, रश्मिका,पूजा दिसणार एकत्र?

सलमान खानला पुन्हा एकदा कॉमेडी-ड्रामामध्ये पाहण्यासाठी लोक उत्सुक असेल.

    मुंबई, 22 जून-   बॉलिवूडमध्ये   (Bollywood)  सध्या अनेक चित्रपटांचे सिक्वेल्स येण्याच्या तयारीत आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे 'नो एंट्री'   (No Entry)  होय. 'नो एंट्री 2' ची   (No Entry 2)  बातमी समोर आल्यानंतर सलमान खानचे चाहते खूप खूश आहेत. 2005 मध्ये आलेल्या 'नो एंट्री'ला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. या चित्रपटात सलमान खानसोबत  (Salman Khan) अनिल कपूर, फरदीन खान, लारा दत्ता, सेलिना जेटली आणि ईशा देओल सारखे कलाकार होते. दरम्यान आता सलमान खानला पुन्हा एकदा कॉमेडी-ड्रामामध्ये पाहण्यासाठी लोक उत्सुक असेल. दुसरीकडे, अभिनेत्याचे चाहते चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीचं नाव जाणून घेण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.याबाबतचा नवा रिपोर्ट आता समोर आला आहे. बॉलिवूड लाईफमधील एका रिपोर्टनुसार, सलमान खानच्या पुढील चित्रपटात साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. एंटरटेनमेंट पोर्टलच्या रिपोर्टनुसार, 'टायगर 3'चं शूटिंग पूर्ण केल्यानंतर सलमान खान 'नो एन्ट्री २'चं शूटिंग सुरू करणार आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्याचे चाहतेही प्रचंड उत्सुक आहेत. या कॉमेडी-ड्रामा असलेल्या हिट चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये अनिल कपूर आणि फरदीन खानसोबत सलमान खान देखील दिसणार आहे. जो 'नो एंट्री २' मध्ये हास्याचा तडका लावणार आहे. बॉलिवूड लाइफनुसार, या चित्रपटासाठी काही टॉप साऊथ अभिनेत्रींचा विचार केला जात आहे. ज्यामध्ये रश्मिका मंदना, समंथा रुथ प्रभू, तमन्ना भाटिया आणि पूजा हेगडे यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. (हे वाचा: बुरखा घालून 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने केलं असं काही, VIDEO पाहताच भडकले युजर्स प्रसिद्ध ) या नावांची सध्या जोरदार चर्चा आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीय. त्यामुळे चित्रपटात कोणत्या अभिनेत्री असणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या पहिल्या भागातील अभिनेत्री लारा दत्ता, सेलिना जेटली आणि ईशा देओल यांचा पत्ता कट झाल्याचं काही रिपोर्ट्समधून समोर आलं आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Rashmika mandanna, Salman khan, South actress

    पुढील बातम्या