मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Koffee With Karan 7: घटस्फोटावर अखेर संमथाने सोडलं मौन, सांगितलं X-पती समोर येताच काय होणार

Koffee With Karan 7: घटस्फोटावर अखेर संमथाने सोडलं मौन, सांगितलं X-पती समोर येताच काय होणार

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. साऊथचे पॉवर कपल म्हणून समंथा आणि नागा चैतन्यला ओळखलं जात होतं. मात्र या दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेत सर्वानांच धक्का दिला होता.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 22 जुलै- साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. साऊथचे पॉवर कपल म्हणून समंथा आणि नागा चैतन्यला ओळखलं जात होतं. मात्र या दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेत सर्वानांच धक्का दिला होता. त्यांनतर सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान आता अभिनेत्रीने पहिल्यांदाचं नॅशनल टेलिव्हिजनवर आपल्या घटस्फोटाबाबत मोकळेपणाने संवाद साधला आहे.

समंथाने 'कॉफी विथ करण 7' मध्ये तिच्या घटस्फोटाबाबत संवाद साधत हे किती वेदनादायक होतं याचा खुलासा केला आहे. करण जोहरसोबत बोलताना समंथाने मान्य केलं की, नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर तिचं आयुष्य कठीण किती कठीण बनलं होतं. अभिनेत्रीच्या या खुलाश्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

बॉलिवूड खिलाडी अर्थातच अभिनेता अक्षय कुमारसोबत समंथाने करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या प्रसिद्ध चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीने अगदी मनमोकळेपणाने आपल्या घटस्फोटावर संवाद साधला.यावेळी बोलताना समंथा म्हणाली, 'नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर तिचं आयुष्य फार कठीण बनलं होतं. मात्र आता ती पूर्वीपेक्षा जास्त मजबूत बनली आहे.

(हे वाचा:Hansika Motwani: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या साडीची होतेय तुफान चर्चा, किंमत जाणून व्हाल थक्क )

त्यांनतर करणने तिला विचारले एक्स पतीबाबत अजूनही हार्ड फीलिंग्स आहेत का? यावर समंथाने म्हटलं, 'हार्ड फीलिंग्स म्हणजे काय? जर तुम्ही एकाच खोलीत असाल आणि तुम्हाला मनातून टोचणाऱ्या गोष्टी एकमेकांपासून लपवाव्या लागत असतील, हा असंच आहे. कारण आता आमच्यात परस्पर संमती नाहीय. त्यामुळे या गोष्टी ठीक होण्यासाठी थोडा वेळ जावा लागेल. यावर करण जोहरने म्हटलं, 'अर्थात सध्या परिस्थिती चांगली नाहीये. यावर समंथा म्हणाली, 'आत्ता नाहीय, पण भविष्यात कधीतरी होईल.'

First published:

Tags: Entertainment, South actress