Home /News /entertainment /

घटस्फोटापूर्वी समंथा-नागाचं सुरु होतं 'बेबी प्लॅनिंग'; वाचा सविस्तर

घटस्फोटापूर्वी समंथा-नागाचं सुरु होतं 'बेबी प्लॅनिंग'; वाचा सविस्तर

सेलेब्रिटीजच्या (Celebrities) खासगी आयुष्यातल्या छोट्या-मोठ्या गोष्टींबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. आपला आवडता हिरो किंवा हिरोइन्सच्या खासगी आयुष्यात काय घडामोडी घडत आहेत, हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर असतात. आपल्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यातल्या सुखाने ते आनंदी होतात, तर दुःखाने दुःखी होतात.

पुढे वाचा ...
     मुंबई, 30 नोव्हेंबर-    सेलेब्रिटीजच्या  (Celebrities)  खासगी आयुष्यातल्या छोट्या-मोठ्या गोष्टींबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. आपला आवडता हिरो किंवा हिरोइन्सच्या खासगी आयुष्यात काय घडामोडी घडत आहेत, हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर असतात. आपल्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यातल्या सुखाने ते आनंदी होतात, तर दुःखाने दुःखी होतात. आजकाल सोशल मीडियामुळे (Scoial Media) तर अगदी क्षणाक्षणाची खबर चाहत्यांपर्यंत पोहोचत असते. सेलेब्रिटीजही आपल्या चाहत्यांशी फोटो, व्हिडिओच्या माध्यमातून जोडलेले असतात. आपल्या आयुष्यातल्या सुखदुःखात त्यांना सहभागी करून घेत असतात. पडद्यावर दिसणाऱ्या जोड्या प्रत्यक्ष आयुष्यातही एकत्र असतील, तर चाहत्यांना त्यांच्याविषयी विशेष कुतूहल असतं. पडद्यावर जसं त्यांचे प्रेम फुलतं, तसंच ते प्रत्यक्ष आयुष्यातही फुलावं, त्यांचा संसार सुखाने व्हावा अशी चाहत्यांची इच्छा असते. त्यामुळे अशा जोड्या चाहत्यांचं विशेष आकर्षण असतात. त्यांच्याविषयीची कोणतीही छोटी-मोठी बातमी दिवसेंदिवस चर्चिली जाते. गेल्या काही दिवसांपासून अशीच एक जोडी चर्चेत आहे, ती म्हणजे टॉलिवूडमधली   (Tollywood)   समंथा रुथ प्रभू  (Samantha Ruth Prabhu)  आणि नागा चैतन्य   (Naga Chaitnya)   यांची. नागा चैतन्य हा टॉलिवूडमधला लोकप्रिय हिरो नागार्जुन (Nagarjun) याचा मुलगा आहे. त्यामुळे समंथा आणि नागा चैतन्य यांची जोडी विशेष आकर्षण होती. टॉलिवूडमधल्या सर्वांत प्रिय जोडप्यांपैकी एक असलेली ही जोडी अलीकडेच विभक्त झाली आहे. त्यांच्या विभक्त होण्यामागच्या कारणांबद्दल आजही चर्चा सुरू आहे. अलीकडेच समंथाने तिचे पूर्वाश्रमीचे सासरे नागार्जुन यांची हैदराबादमधल्या (Hyderabad) अन्नपुरण स्टुडिओमध्ये (Annapuran Studio) भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा या जोडीविषयी चर्चा सुरू झाली. व्यावसायिक डबिंग असाइनमेंटसाठी (Dubbing Assignement) समंथाने ही भेट घेतली असल्याचं नंतर स्पष्ट झालं. 'बॉलिवूड लाइफ'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. काही महिन्यांपूर्वी या जोडीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपण अधिकृतरीत्या विभक्त होत असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. तेव्हापासून या जोडीच्या प्रेमाची, त्यांच्या लग्नाची आणि विभक्त होण्याची चर्चा सुरू आहे. समंथाने आपल्या करिअरसाठी हे नातं तोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. समंथा आणि नागा चैतन्य ही चाहत्यांची अतिशय लाडकी जोडी होती. त्यांच्या प्रेमकथेचा शेवट असा होईल, अशी कल्पनाही कोणाला नव्हती.समंथा रुथ प्रभू हिने लग्नानंतर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आपलं नाव समंथा अक्किनेनी असं लावलं होतं. तिने सोशल मीडिया अकाउंटवर आपलं लग्नापूर्वीचं समंथा रुथ प्रभू असं नाव पुन्हा लावलं तेव्हाच त्यांच्या विभक्त होण्याची चर्चा सुरू झाली. त्याच वेळी समंथा आणि नागा चैतन्य आपल्या पहिल्या बाळाला जन्म देण्याचं नियोजन करत असल्याचीही चर्चा होती. (हे वाचा:Antim Box Office Collection Day 4: 'अंतिम' च्या कमाईत घट; सोमवारी जमवले इतके....) एवढंच नव्हे, तर समंथाने एका मुलाखतीत आपल्याला मूल (Baby) झाल्यानंतर ते आपलं पहिलं प्राधान्य असेल असं सांगितलं होतं. 2018मध्ये, नागा चैतन्यशी लग्न झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनंतर, समंथा रूथ प्रभूने फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती, की 'मुलासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य देईन. माझ्यासाठी ते बाळ सर्व काही असेल. माझं स्वतःचं बालपण चांगलं गेलं नाही; पण बाळाला पूर्ण वेळ देणार आहे.'याचाच अर्थ ती कुटुंबाला प्राधान्य देऊन आपलं करिअर मागे ठेवणार असल्याचं मानलं जात होतं. इंडिया टुडेनेही असंच काहीसं वृत्त दिलं होतं. प्रत्यक्षात मात्र वेगळंच घडलं आहे. आता हा सगळा भूतकाळ झाला आहे. रसिकांची ही लाडकी जोडी आता विभक्त झाली आहे. समंथाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरूनदेखील आपले आणि नागा चैतन्यचे फोटो काढून टाकले असून, नुकताच नागा चैतन्य याचा वाढदिवस झाला तेव्हाही तिनं सोशल मीडियावरून त्याला शुभेच्छा दिल्या नाहीत. यावरून या जोडीने आपले संबंध पूर्णतः तोडून टाकल्याचं स्पष्ट होत आहे.
    First published:

    Tags: Entertainment, South actress

    पुढील बातम्या