मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Samantha Ruth Prabhu : घटस्फोटानंतर समांथा पुन्हा लग्न करण्यास तयार!; या गोष्टीमुळे चर्चांना उधाण

Samantha Ruth Prabhu : घटस्फोटानंतर समांथा पुन्हा लग्न करण्यास तयार!; या गोष्टीमुळे चर्चांना उधाण

Samantha Ruth Prabhu

Samantha Ruth Prabhu

मागच्या वर्षी समांथाने तिचा पती नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्याची घोषणा केल्यानंतर ती प्रचंड चर्चेत आली होती. त्यानंतर दोन्ही स्टार्सच्या चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र आता समंथाच्या खाजगी आयुष्याबद्दल मोठी गोष्ट समोर येत आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 22 सप्टेंबर :  दक्षिणेतील  चित्रपटसृष्टी तसेच बॉलिवूडमध्येही सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे  समांथा रुथ प्रभू. तिने दक्षिणेतील चित्रपटांमध्ये आपल्या दर्जेदार अभिनयाची छाप सोडली आहेच. पण 'द फॅमिली मॅन 2' मधील भूमिका आणि अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटातील गाण्यानंतर ती अजूनच लोकप्रिय झाली. मागच्या वर्षी समांथाने तिचा पती नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्याची घोषणा केल्यानंतर ती प्रचंड चर्चेत  आली होती. त्यानंतर दोन्ही स्टार्सच्या चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र, तेव्हापासून चाहते त्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी जोर धरत आहेत. दोघांनीही आपापल्या आयुष्यात पुढे गेल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, समांथा आता पुन्हा एकदा लग्नासाठी तयार  आहे अशी बातमी समोर आली आहे. समांथा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतंच समांथाने तिच्या पुढील आयुष्याबद्दल एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. समंथा तिचे गुरु सद्गुरुंच्या आज्ञेनुसार पुन्हा  लग्न करण्यास तयार झाली आहे. एका  वृत्तानुसार, समांथाला तिचे गुरू सद्गुरु जगदीश वासुदेव यांनी पुन्हा लग्न करण्याचा सल्ला दिला आहे, असे म्हटलं जात आहे. हेही वाचा - Kangana Ranaut साठी ही अभिनेत्री आहे रियल 'क्वीन'; कौतुक करत म्हणाली...
  विशेष म्हणजे गुरुंनी दिलेल्या प्रत्येक सल्ल्याचे समांथा पालन करते. त्यामुळे तिने त्यांचा हा सल्लाही मान्य केला आहे. सध्या तिचे गुरु तिला तिचा भूतकाळ विसरण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत आहेत. त्यामुळे आता समांथाने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले जात आहे. मात्र, आतापर्यंत या वृत्ताला समंथाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून समांथा रुथ प्रभूपासून घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य मेजर फेम अभिनेत्री शोभिता धुलिपालाला डेट करत असल्याचे सांगण्यात येत आहे. असं म्हटलं जातं की चैतन्यने शोभिताला त्याचं घरही दाखवलं आणि दोघांनीही तिथे एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवला. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, समंथा रुथ प्रभू पुढे यशोदा, 'शाकुंतलम' आणि 'कुशी' मध्ये दिसणार आहे. त्यानंतर ती दिनेश विजानच्या बॉलीवूड आणि इंग्रजी चित्रपट 'द अरेंजमेंट्स ऑफ लव्ह' मधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
  Published by:Nishigandha Kshirsagar
  First published:

  Tags: Bollywood actress, Entertainment

  पुढील बातम्या