Home /News /entertainment /

समंथाने शेअर केली नागा चैतन्य आणि साई पल्लवीची 'लव्हस्टोरी', म्हणाली...

समंथाने शेअर केली नागा चैतन्य आणि साई पल्लवीची 'लव्हस्टोरी', म्हणाली...

दरम्यान काही दिवसांपूर्वी समंथाने सोशल मीडियावर तिच्या नावासमोमोरून अक्कीनेनी हे नाव हटवलं होतं. त्यांनंतर समंथा आणि नागा चैतन्य यांच्या नात्यावर प्रश्न निर्माण झाले होते.

  मुंबई 14 सप्टेंबर : साउथ अभिनेत्री समंथा अक्कीनेनी (Samantha Akkineni) सध्या फारच चर्चेच आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनची (Nagarjuna) सून म्हणूनही तिची ओळख आहे. नागार्जुनचा मुलगा नागा चैत्यन्यची (Naga Chaitanya) ती पत्नी आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या प्रसिद्ध कपल विषयी अनेक बातम्या समोर येत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी समंथाने सोशल मीडियावर तिच्या नावासमोमोरून अक्कीनेनी हे नाव हटवलं होतं. त्यांनंतर समंथा आणि नागा चैतन्य यांच्या नात्यावर प्रश्न निर्माण झाले होते. समंथा आणि नागा चैतन्यच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी निर्माण झाल्या आहेत अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. इतकच नाही तर त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्याही येऊ लागल्या. दरम्यान आता समंथाने आता नागा चैतन्यविषयी एक ट्वीट केलं आहे. समंथाने हे नागा चैतन्यचं हे रिट्वीट केलं आहे. त्याने लिहिलं होतं. त्यासोबत ‘लवकरच चित्रपटगृहात भेटू’ असं कॅप्शन त्याने या पोस्टवर दिली आहे. ‘लव्ह स्टोरी’ या त्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या चित्रपटात नागा चैतन्यसोबत अभिनेत्री साई पल्लवी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नागा चैतन्यचे हे ट्वीट रीट्विट करत समांथाने साई पल्लवीला शुभेच्छा दिल्या आहेत.

  VIDEO: घागर घुमूदे घुमूदे! प्राजक्ता गायकवाडनं नृत्य करत केली गौराईंची पूजा

  लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान कोरोनामुळे चित्रपटाच्या प्रदर्शणाची तारीख सतत पुढे ढकलण्यात येत होती. मात्र, आता निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शणाचा निर्णय घेतला आहे. नागा चैतन्य आणि साई पल्लवी यांची रोमँटीक स्टोरी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘लव्ह स्टोरी’मध्ये देवयानी, राव रमेश, पोसानी कृष्णा मुरली, राजीव कनकला आणि ईश्वरी राव मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘लव्ह स्टोरी’ चित्रपटात रेवंथ आणि मोनिकाची ही पात्र दिसणार आहेत. त्यांची प्रेमकाहाणी पाहायला मिळणार आहे. अमिगॉस क्रिएशन्स आणि श्री वेंकटेश्वर सिनेमा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, South film

  पुढील बातम्या