Home /News /entertainment /

'ती बाई कोण?' अभिनेता स्वप्निल जोशीच्या समांतर 2 मध्ये काय असणार नवा ट्विस्ट?

'ती बाई कोण?' अभिनेता स्वप्निल जोशीच्या समांतर 2 मध्ये काय असणार नवा ट्विस्ट?

अभिनेता स्वप्निल जोशीने त्याच्या 'समांतर 2' या सीरिज बाबत एक ट्विट केले आहे. त्याने चाहत्यांना सीरीजमधील 'त्या बाई'च्या भूमिकेसाठी कुणाला कास्ट करावं असा प्रश्न विचारला आहे.

    मुंबई, 21 जुलै : अभिनेता स्वप्निल जोशी, नितिश भारद्वाज, अभिनेत्री तेजस्विनी पंडित अशी तगडी स्टारकास्ट असणारी 'समांतर' (Samantar) ही एमएक्स प्लेअरची सीरिज अल्पावधीतच प्रसिद्ध झाली. सतीश राजवाडे याने या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये थ्रीलर, सस्पेन्स, रोमान्स हे सारेच फॅक्टर प्रेक्षकांना आवडले होते. आता चाहत्यांना समांतर 2 ची (Samantar Season 2) प्रतीक्षा आहे. समांतरमध्ये स्वप्निल जोशीने 'कुमार महाजन' हे पात्र साकारले आहे. तर तेजस्विनी त्याच्या पत्नीचा भूमिकेत आहे. तर नितिश भारद्वाज यांनी सुदर्शन चक्रपाणी ही भूमिका साकारली आहे. यामध्ये असे दाखवण्यात आले आहे की, दोघांचे आयुष्य 'समांतर' आहे. जे सुदर्शन चक्रपाणीच्या आयुष्यात घडून गेले आहे, तेच कुमारच्या आयुष्यात पुन्हा घडणार आहे. अशावेळी कुमार सुदर्शनला शोधून काढतो आणि स्वत:चे भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. या सीरिजच्या पहिल्या सीझनचा शेवट देखील उत्कंठा वाढवणाऱ्या कथानकावर झाला होता. (हे वाचा-'मी या नवीन कंगनाला ओळखत नाही',असं काय झालं की अनुराग कश्यपने कंगनाला फटकारलं?) 'समांतर'च्या शेवटच्या भागात असे दाखवण्यात आले आहे की, तेजस्विनी पंडित जिने स्वप्निल जोशी अर्थात कुमार महाजनच्या बायकोची भूमिका साकारली आहे तिच्या व्यतिरिक्त आणखी 'एका बाई'ची एंट्री कुमारच्या आयुष्यात होते. तर ही बाई कोण असेल अशी उत्कंठा चाहत्यांना लागून राहिली आहे. अभिनेता स्वप्निल जोशीने चाहत्यांना असा प्रश्न विचारला आहे की, 'समांतर2 मधील "ती बाई" !!! कुठल्या अभिनेत्रीला बघायला आवडेल !?' त्याने कमेंटमध्ये चाहत्यांना याचे उत्तर देण्यास सांगितले आहे. दरम्यान स्वप्निलने केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी अनेक अभिनेत्रींची नावं सुचवली आहेत. यामध्ये सई ताम्हणकर, वैदेही परशुरामी तसंच अपुर्वा नेमळेकर म्हणजेच शेवंता ही नाव सुचवली आहेत. (हे वाचा-संगीतकार ए. आर. रेहमानसह दिग्गज गायक सुशांतला देणार म्युझिकल ट्रिब्युट) यामधील कलाकारांना वेळोवेळी विचारण्यात आले होते, की याचा दुसरा सीझन कधी येणार. काही दिवसापूर्वी स्वप्निल जोशीने देखील असे संकेत दिले होते की, लवकरच सीझन दुसरा येत आहे. त्याने नितिश भारद्वाज यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली होती.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Swapnil joshi, Tejaswini pandit

    पुढील बातम्या