'आयफा'मध्ये सलमाननं गायलं कतरिनासाठी 'बर्थडे साँग'

त्यानं कतरिनासाठी हॅपी बर्थडे सॉंग म्हणायला सुरूवात केली आणि उपस्थितानींही लगेच सूर मिसळला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2017 06:05 PM IST

'आयफा'मध्ये सलमाननं गायलं कतरिनासाठी 'बर्थडे साँग'

16 जुलै: अनेकांच्या 'दिलो की धडकन' असलेल्या कतरिना कैफचा आज वाढदिवस आहे. कतरिना आज 34 वर्षांची झाली. पण कतरिनाचा वाढदिवस सलमानने तिच्यासाठी खूपच स्पेशल केला.

तर झालंय असं की आयफाची प्रेस कॉन्फरन्स चालू होती. या प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळे कलाकार आपले अनुभव शेअर करत होते. हे सगळं चालू असताना मध्येच सलमानने अनुपम खेरला आयफाची तारीख विचारली. आणि पुढे तो म्हणाला ,'मी तारखा लक्षात ठेवत नाही. तारखा मला सहसा लक्षात राहात नाहीत.पण एक तारीख मी कधीच विसरू शकत नाही ,आणि ती म्हणजे कतरिनाचा वाढदिवस!'

16 जुलै हा कतरिनाचा वाढदिवस.लगेच त्यानं कतरिनासाठी हॅपी बर्थडे सॉंग म्हणायला सुरूवात केली आणि उपस्थितानींही लगेच सूर मिसळला.

आता सलमान कतरिनाला विसरू शकत नाही की कतरिनाचा फक्त वाढदिवस विसरू शकत नाही हे त्यालाच माहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2017 06:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...