S M L

'एफ.यु.'चं मोशन पोस्टरही सलमाननं केलं ट्विट

झिंगाट या गाण्यानंतर सर्वांनाच झिंगाट ताल धरायला लावणारा आकाश ठोसर 'एफ.यु' या सिनेमातही डान्स करताना दिसेल.

Sonali Deshpande | Updated On: Apr 14, 2017 07:34 PM IST

'एफ.यु.'चं मोशन पोस्टरही सलमाननं केलं ट्विट

नीलिमा कुलकर्णी,14 एप्रिल : 'सैराट'मधला परशा म्हणजेच आकाश ठोसर याने पदार्पणातच प्रेक्षकांची मनं जिंकली. सैराटनंतर पुढे आकाश ठोसर काय करणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच बातमी आली की महेश मांजरेकरांच्या 'एफ.यु.' या सिनेमात आकाश ठोसर प्रमुख भूमिकेत दिसेल.झिंगाट या गाण्यानंतर सर्वांनाच झिंगाट ताल धरायला लावणारा आकाश ठोसर 'एफ.यु' या सिनेमातही डान्स करताना दिसेल कारण हा सिनेमा म्युझिकल मेजवानीही ठरणार आहे असं बोललं जातंय.सलमान खानने या सिनेमाचं मोशन पोस्टर ट्विटरवर प्रदर्शित केल्यामुळे आतापासूनच सोशल मीडियावर सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

एफ.यु म्हणजेच 'फ्रेण्डशीप अनलिमिटेड' या सिनेमात अनेक गाण्यांची ट्रीट प्रेक्षकांना मिळणार आहे.महेश मांजरेकरांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून यात आकाश ठोसरसोबत संस्कृती बालगुडे, सत्य मांजरेकर, मयुरेश पेम ही यंगब्रिगेड झळकणार आहे. कॉलेजविश्वातील धमालमस्ती यात पाहायला मिळणार आहे.

Loading...
Loading...

विशेष म्हणजे सलमान खानने एफ.युचं पहिलं मोशन पोस्टर ट्विटरच्या माध्यमातून प्रदर्शित केलं. महेश मांजरेकर यांचा हा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे असं ते सांगतात.'एफ.यु' येत्या 2 जूनला प्रदर्शित होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2017 07:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close