सलमान खान भगवान शंकराच्या भूमिकेत?

दंबग खान सलमानने या सिनेमात काम करावं अशी भन्साळींची इच्छा आहे

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2017 03:06 PM IST

सलमान खान भगवान शंकराच्या भूमिकेत?

18 ऑगस्ट: अमिश त्रिपाठींची काही वर्षांपूर्वी आलेली 'द इमॉरटल्स ऑफ मेलुहा' ही कादंबरी प्रचंड गाजली होती. याच कादंबरीवर आधारित एक सिनेमा संजय लीला भन्साळी बनवणार असल्याची सध्या चर्चा आहे. भगवान शंकरांना केंद्रस्थानी ठेऊन लिहिलेल्या या कादंबरीवर येणाऱ्या सिनेमात सलमान खान भगवान शंकराच्या भूमिकेत दिसू शकतो.

सध्यातरी या सिनेमासाठी भन्साळी अभिनेत्याच्या शोधात आहेत. या आधी या सिनेमात ह्रतिक रोशन झळकणार असल्याची चर्चा होती. मात्र आता दंबग खान सलमानने या सिनेमात काम करावं अशी भन्साळींची इच्छा आहे. जर भन्साळी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असतील तर सलमानही या सिनेमात काम करण्यास तयार असेल असं समजतंय.

आधी करण जोहर या सिनेमाची निर्मिती करणार होता. आलिया भटपासून करिना कपूरपर्यंत अनेक अभिनेत्री पार्वतीच्या भूमिकेत असल्याची चर्चा होती. आता सलमानसोबत या सिनेमात कोण झळकेल आणि शंकराच्या भूमिकेत सलमान कसा दिसेल याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2017 03:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...