11डिसेंबर : सलमान खानची 'दबंग' टूर आता दिल्लीला पोचली. तिथे सलमानच्या परफाॅर्मन्सनं सगळे फॅन्स एकदम खूश झाले. या टूरमध्ये सोनाक्षी सिन्हा, प्रभूदेवा, कृती सनाॅन, डेझी यांनी आपल्या हिट गाण्यांचे परफाॅर्मन्सेस दिले.
या सोहळ्यात मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे सल्लूमियाँ. सलमान खानची एंट्री झाली ती जोशातच. आल्या आल्याच तो म्हणाला, स्वागत नही करोगे हमारा?
सलमानने आपली गाणी ‘मुझसे शादी करोगी’, ‘गरम चाय की प्याली हो’, ‘मुन्नी बदनाम’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ गाण्यांवर परफाॅर्मन्स केला. एवढंच नाही तर सल्लूमियाँनं प्रेक्षकांसाठी गाणीही म्हटली. ‘हमको मालूम है’, ‘तेरी मेरी’, ‘दिल दीवाना’, ‘मैं हूं हीरो तेरा, ‘जग घूमेया’ ही गाणी म्हणत आणि त्यावर डान्स करत त्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
BIGGEST CROWD PULLER@BeingSalmanKhan
Loading...Loading...DABANGG SALMAN IN DELHI pic.twitter.com/UXLkwHk9ow
— Sardar Singh (@iSalmansCombat) 10 December 2017
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा