पुन्हा सलमान शाहरूख एकत्र

पुन्हा सलमान शाहरूख एकत्र

आनंद एल राय यांच्या आगमी सिनेमात शाहरुख प्रमुख भूमिकेत झळकणार असून सलमान त्यात पाहुणा कलाकार म्हणून हजेरी लावणार असल्याची चर्चा चालू आहे.

  • Share this:

29 जून : 'ट्युबलाईट' नंतर पुन्हा एकदा किंग खान शाहरुख आणि दबंग खान सलमान रूपेरी पडद्यावर एकत्र झळकणार असल्याचं बोललं जातंय.

सलमानच्या सिनेमात शाहरुखने कॅमिओ केल्यानंतर आता सलमानही शाहरुखच्या सिनेमात दिसणार असल्याची शक्यता आहे.आनंद एल राय यांच्या आगमी सिनेमात शाहरुख प्रमुख भूमिकेत झळकणार असून सलमान त्यात पाहुणा कलाकार म्हणून हजेरी लावणार असल्याची चर्चा चालू आहे.बॉलिवूडच्या या करण-अर्जुनची ही जोडी पुन्हा एकत्र येणार म्हणजे दोन्ही स्टार्सच्या फॅन्ससाठी ही एक मोठी पर्वणीच ठरेल.

सलमान शाहरुखसोबत पुन्हा एकत्र येणारंच आहे.मात्र 'ट्युबलाईट' नंतर कबीर खान आणि भाईजान पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याच्या चर्चेनेही जोर धरलाय.

कबीर खान यांच्या आगामी सिनेमात सलमान सीनियर सिटिझनच्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जातंय.

सलमानचा 'ट्युबलाईट' सिनेमा बॉक्स ऑफिसवर थोडा स्लो पकड धरतोय.मात्र आता एका हटके भूमिका करावी अशी सलमानची इच्छा आहे. 'ट्युबलाईट'च्या शूटिंग दरम्यान कबीर आणि सलमानमध्ये या सिनेमाबाबत चर्चा झाली होती मात्र याबाबत कोणतीच अधिकृत घोषणा केली गेली नसून सिनेमा नक्की काय असणारे ते जाणून घेण्यासाठी थोडी वाट पहावी लागेल.

First published: June 29, 2017, 3:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading