सलमानचं दिवाळी गिफ्ट, 'टायगर जिंदा हे'च पोस्टर रिलीज

प्रत्येक वर्षी ईदला आपला सिनेमा घेऊन येणाऱ्या सलमाने यंदाच्या दिवाळीला आपल्या चाहत्यांना अनोखं गिफ्ट दिलं आहे. आपल्या लाडक्या भाईजानचा 'टायगर जिंदा हे'चा लेटेस्ट पोस्टर रिलीज झालं आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2017 09:05 PM IST

सलमानचं दिवाळी गिफ्ट, 'टायगर जिंदा हे'च पोस्टर रिलीज

18ऑक्टोबर: दबंग खान सलमान आपल्या चाहत्यांना नेहमीच खुश ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. प्रत्येक वर्षी ईदला आपला सिनेमा घेऊन येणाऱ्या सलमाने यंदाच्या दिवाळीला आपल्या चाहत्यांना अनोखं गिफ्ट दिलं आहे. आपल्या लाडक्या भाईजानचा 'टायगर जिंदा हे'चा लेटेस्ट पोस्टर रिलीज झालं आहे.

सलमानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे पोस्टर शेअर केलंय. त्यात सलमान म्हणतोय "दिवाली गिफ्ट पसंद आया? अब क्रिसमस पर मिलना". या पोस्टरची टॅगलाइन खुप प्रभावी आहे. या पोस्टरमध्ये लिहिलं आहे, "जखमी वाघसारखं कोणीही शिकार करत नाही" इतकंच नाही तर यात सल्लुमियाचा लुकही जरा हटकेच आहे.

भाईच्या हातात बंदूक आहे आणि चेहऱ्यावर राग आहे. या सिनेमात सलमान सोबत कतरीना कैफ मुख्य भुमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 2012 मध्ये आलेल्या 'एक था टायगर' चा सिक्वेल आहे. खुप दिवस या सिनेमाच्या सिक्वेलची उत्सुकता सलमानच्या चाहत्यांना होतीच, अखेर हा सिनेमा ख्रिसमसपर्यंत आपल्या भेटीला येईल हे नक्की.

एक था टायगर हा सिनेमा प्रचंड गाजला होता. आता  त्याचा सिक्वेलही लोकांच्य पसंतीस उतरतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2017 09:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...