कतरिनामुळे सलमान-लुलियाचा ब्रेकअप?

कतरिनामुळे सलमान-लुलियाचा ब्रेकअप?

  • Share this:

19 ऑक्टोबर: सलमान खान आणि लुलिया वेंतूरचा ब्रेकअप झालाय? खरं की खोटं माहित नाही पण अशी चर्चा आता चांगलीच रंगतेय. कतरिना कैफच्या येण्यानं या दोघांचा ब्रेकअप झाल्याचं बोललं जातंय.

बऱ्याच दिवसांपासून याबाबत सगळ्यांनाच शंका होतीच. पण आता सलमान आणि लुलियाच्या ब्रेकअप झाला असल्याचं सलमानच्या वागण्यातून दिसतंय. कारण लुलियाचा व्हिजा संपला आहे आणि म्हणुन तिला घरी रोमानियाला परत जाव लागलं. खरंतर सलमान प्रत्येक वेळेस लुलियाचा व्हिजा वाढवून घेतो पण यावेळेस त्याने तिला तिच्या घरी जाऊ दिलं. त्यामुळे सलमान लुलियाला लांब ठेवू इच्छीतो हे नक्की.

कतरिना कैफ आता अली अब्बास जफरच्या 'टायगर जिंदा है' या सिनेमात सलमानसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नुकतंच या सिनेमाचं मोरोक्कोमध्ये शूटिंगही झालं आहे.

लुलियाचा सलमानच्या प्रोफेशनल आयुष्यातला हस्तक्षेप वाढला होता. पण आता सलमानच्या आयुष्यात कतरिना परत येणार अशी चिन्हं दिसत आहेत. लुलियाला याचा संशय येताच तिने सलमानला अबु-धाबीला चलण्याचा हट्ट केला. कारण ती त्याच्यावर नजर ठेवू शकेल. पण सलमानने तिला नकार दिला.

लुलिया वेंतूर गेल्या तीन वर्षांपासून सलमानच्या आयुष्यात होती. ती बऱ्याचवेळा सलमान आणि त्याच्या घरच्यांसोबत अनेक कार्यक्रमात दिसली. त्याने अनेक कार्यक्रमात लुलियाला प्रमोटही केलं आहे. एवढंच काय तर सलमानच्या दबावाने आणि त्याच्या दराऱ्याने लुलियाला अनेक मोठ्या स्क्रिन्स मिळाल्या. गायक हिमेश रेशमियासोबत तिने अल्बमही रिलीज केला. कपिल शर्माच्या शोमध्येही तिला चांगलंच फुटेज मिळालं.

पण आता या दोघांचा ब्रेक अप झाल्यामुळे आता कतरिना-सलमान परत एकत्र येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: October 19, 2017, 5:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading