मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Somy Ali: 'महिलांना मारहाण करणारा..', सलमानच्या X-गर्लफ्रेंडनं पुन्हा केले खळबळजनक आरोप

Somy Ali: 'महिलांना मारहाण करणारा..', सलमानच्या X-गर्लफ्रेंडनं पुन्हा केले खळबळजनक आरोप

 बॉलिवूड भाईजान अर्थातच अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. सलमानननं अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे.

बॉलिवूड भाईजान अर्थातच अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. सलमानननं अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे.

बॉलिवूड भाईजान अर्थातच अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. सलमानननं अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे.

    मुंबई, 20 ऑगस्ट-   बॉलिवूड भाईजान अर्थातच अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. सलमानननं अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. ऐश्वर्या रॉय, कतरिना कैफ, सोमी अली आणि संगीता बिजलानी यांच्याशी सलमानचं नाव जोडलं गेलं आहे. परंतु सोमी अलीनं सलमानवर अनेक आरोप केले होते. इतक्या वर्षानंतर पुन्हा आता अभिनेत्रीनं सलमानवर आरोप करत खळबळ माजवली आहे. अभिनेत्री सोमी अलीनं पुन्हा एकदा सलमानवर निशाणा साधला आहे. अभिनेत्रीनं इन्स्टाग्रामवर 'मैने प्यार किया'चं एक पोस्टर शेअर केलं आहे. यासोबतच सोमीनं एक कॅप्शनसुद्धा लिहलं आहे. या कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीनं या पोस्टमधून सलमानवर टीका केली आहे.सोमीनं पोस्टमध्ये लिहलंय, 'ज्या व्यक्तीनं महिलांवर अत्याचार केला. त्यानं केवळ माझ्यासोबतच नाही, तर अनेक महिलांसोबत असं केलं आहे. त्यांची पूजा करणं बंद करा'.असं अभिनेत्रीनं पुन्हा माजवून दिली आहे. सोमी अलीनं आपल्या पोस्टमध्ये पुढं लिहलंय, 'तो एक मनोरुग्ण आहे. तुम्हाला त्याची कल्पना नाही. सोमी अलीनं 10 तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली होती. परंतु आता अभिनेत्रीनं ही पोस्ट डिलीट केली आहे. अभिनेत्रीनं यापूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती सलमानला डेट करत होती. इतकंच नव्हे तर सोमीनं सलमानवर आपली फसवणूक केल्याचा आरोपही केला होता. अभिनेत्रीनं अनेक गंभीर आरोप करत सर्वांनाच चकित केलं होतं. परंतु इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा सलमानवर निशाणा साधत अभिनेत्री चर्चेत आली आहे. (हे वाचा:Katrina Kaif Pregnancy: विकीसोबत क्लिनिकमध्ये पोहोचली कतरिना कैफ; प्रेग्नेंसीच्या चर्चांनी धरला जोर ) सोमी अली ही मुळची पाकिस्तानी आहे. 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी ती भारतात आली होती. यादरम्यान तिला आलेले विविध अनुभव तिनं अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहेत. महत्वाचं म्हणजे या मुलाखतीत तिनं सलमानसोबतच्या नात्यावरही सतत भाष्य केलं आहे. शिवाय सलमाननं मला फसवलं असाही आरोप तिनं केला होता. एका मुलाखती दरम्यान सोमीनं म्हटलं होतं, , “सलमानसोबत मी रिलेशनशिपमध्ये होते. मी त्याच्यासाठी खूपच पझेसिव्ह होते. कदाचित माझी हिच सवय त्याला आवडत नसावी. त्यामुळं अनेकदा तो माझ्यावर नाराजही होत असे. याच दरम्यान आमच्या आयुष्यात संगीता बिजलानी आली. अन् सलमानचं पूर्ण लक्ष तिनं वेधून घेतलं. तेव्हापासून सलमान सतत तिच्यासोबतच राहू लागला. मी सलमानवर खूप प्रेम केलं. पण त्याबदल्यात त्यानं माझा विश्वासघात केला. ब्रेकअपमुळं मी नैराश्येत गेले अन् कायमचं बॉलिवूड सोडून दिलं'.असं म्हणत अभिनेत्रीनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता'.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Salman khan

    पुढील बातम्या