जेव्हा सलमान गातो '...तुम देना साथ मेरा'!

सलमाननं गाणं गाऊन आई-वडिलांना छान गिफ्ट दिलं. तो व्हिडिओही वायरल झालाय.

Sonali Deshpande | Updated On: Nov 21, 2017 01:03 PM IST

जेव्हा सलमान गातो '...तुम देना साथ मेरा'!

21 नोव्हेंबर : सलमान खान आपल्या बिझी शेड्युलमधून आपल्या कुटुंबासाठी नेहमीच वेळ काढत असतो. नुकताच त्याच्या घरी एक मोठी पार्टी झाली. निमित्त होतं अर्पिता आणि त्याच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवसाचा. सलमानची बहीण अर्पिताचं लग्नही सलीम खान- सलमा खान यांच्या लग्नाच्या वाढदिवशी झालं. त्यामुळे घरात डबल सेलिब्रेशन.

सलमाननं गाणं गाऊन आई-वडिलांना छान गिफ्ट दिलं. तो व्हिडिओही वायरल झालाय. सलमान त्यात गाण्यामध्ये चांगलाच रमलाय.

मुंबईतील या पार्टीत निवडक जवळचे लोक सहभागी झाले होते, ज्यात कतरिना कैफही होती. अर्पिताच्या घरी ही पार्टी होती. पार्टीत युलिया वंतूर, मलाईका अरोरा, अमृता अरोरा, सोहा अली खान, कुणाल खेमू, दिया मिर्जा यांसारखे आणखी काही कलाकार सहभागी झाली होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 21, 2017 01:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close