VIDEO : अनिल कपूरनं सलमानसमोर ऐश्वर्याचं नाव घेतलं आणि...

VIDEO : अनिल कपूरनं सलमानसमोर ऐश्वर्याचं नाव घेतलं आणि...

अनिल कपूरनं सिनेमाबद्दल सांगताना ऐश्वर्या राय बच्चनचं नाव घेतलं आणि सलमान खानच्या डोळ्यात एकच चमक दिसली.

  • Share this:

मुंबई, 26 जुलै : सध्या अनिल कपूर फन्ने खाँ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. नुकताच तो सलमान खानच्या दस का दम शोमध्ये आला होता. दोघांनी शोमध्ये खूप धमाल केली. पण एक गंमत झाली. अनिल कपूरनं सिनेमाबद्दल सांगताना ऐश्वर्या राय बच्चनचं नाव घेतलं आणि सलमान खानच्या डोळ्यात एकच चमक दिसली. सलमान आणि ऐश्वर्याचा ब्रेकअप होऊन बरीच वर्ष उलटली. पण तरीही सलमानच्या मनातलं तिच्याबद्दलचं प्रेम काही लपत नाही. यावेळी प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. पार्श्वभूमीवर हम दिल दे चुके है सनमचं संगीत वाजत होतं. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

अनिल कपूर या सिनेमात त्याच्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या पिहूला घेऊन सेटवर पोचला होता. तो सिनेमाबद्दल माहिती देत होता. ' आमची जी लता आहे ती बेबी सिंगची फॅन आहे. बेबी सिंग म्हणजे ऐश्वर्या राय,' इथे अनिल कपूरनं पाॅज घेतला. आणि मग पुन्हा त्यानं ऐश्वर्याचं पूर्ण नाव घेतलं. म्हणाला, ' ऐश्वर्या राय बच्चन'. अशा वेळी सलमानच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे होते.

हेही वाचा

सुबोध भावेच्या 'सविता दामोदर परांजपे'चा फर्स्ट लूक पाहिलात का?

अनुष्का शर्मानं कुठला घेतलाय महत्त्वाचा निर्णय?

Happy Birthday Mugdha Godse: मुग्धाच्या या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

या सिनेमात ऐश्वर्यावर शूट झालेलं गाणं जवाँ है मोहब्बत सलमाननं स्वत: गायलं आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या प्रमोशनसाठी ऐश्वर्या आली नाही, याचीही चर्चा खूप होती. ब्रेकअपनंतर सलमान आणि ऐश्वर्या समोरासमोर यायचं टाळतायत. एखाद्या इव्हेंटला दोघं आले, तरी ते एकमेकांकडे लक्षही देत नाहीत. म्हणजे लक्ष नाही असं दाखवतात. सलमानच्या आयुष्यात आतापर्यंत अनेक मुली आल्यात. पण त्याचं खरं प्रेम ऐश्वर्यावरच होतं, हे पुन्हा पुन्हा जाणवतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2018 12:30 PM IST

ताज्या बातम्या