‘राधे’ कोरिअर मालिकेची कॉपी? सलमानचा ट्रॅक रेकॉर्ड पाहून प्रेक्षकांना पडला प्रश्न

‘राधे’ कोरिअर मालिकेची कॉपी? सलमानचा ट्रॅक रेकॉर्ड पाहून प्रेक्षकांना पडला प्रश्न

सलमान खानचा (Salman Khan) आगामी ‘राधे: युअर मोस्ट वॉण्टेड भाई’ (Radhe Your Most Wanted Bhai) हा चित्रपट देखील एका कोरिअन मालिकेची कॉपी असल्याची चर्चा आहे.

  • Share this:

मुंबई 27 मार्च: बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर उचलेगीरी केली जाते. या सिनेसृष्टीतील अनेक गाणी, चित्रपट, डायलॉग्स अगदी अॅक्शन सीन्स देखील हॉलिवूड किंवा कोरिअन चित्रपटांमधून कॉपी केले जातात. काही वेळा ही नक्कल अधिकृतरित्या केली जाते, तर काही वेळा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समिक्षक त्याचे पुरावे शोधून प्रेक्षकांसमोर सादर करतात. सलमान खानचा (Salman Khan) आगामी ‘राधे: युअर मोस्ट वॉण्टेड भाई’ (Radhe Your Most Wanted Bhai) हा चित्रपट देखील एका कोरिअन मालिकेची कॉपी असल्याची चर्चा आहे.

1995 साली दक्षिण कोरियामध्ये ‘सँडग्लास’ (Sandglass) या नावाची एक मालिका तुफान गाजली होती. या मालिकेला ‘आरग्लास’ असंही म्हणतात. ही सुपरहिट मालिका एकूण तीन व्यक्तिरेखांवर आधारित होती. यापैकी एक गँगस्टर दुसरा प्रॉसीक्यूटर आणि तिसरी सुंदर मुलगी होती. असं म्हटलं जातयं की राधे हा चित्रपट याच मालिकेवर आधारित आहे. यामध्ये सलमान गँगस्टरच्या भूमिकेत झळकणार, रणदीप हुडा प्रॉसीक्यूटरच्या आणि दिशा पटानी सुंदर मुलीची भूमिका साकारणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थात याबद्दल अद्याप सलमाननं कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु गेल्या काही काळात त्यानं केलेले ‘दबंग’, ‘बॉडिगार्ड’, ‘रेडी’, ‘एक था टायगर’, ‘जय हो’, ‘किक’, ‘ट्युबलाईट’ असे अनेक चित्रपट दाक्षिणात्य किंवा कोरिअन चित्रपटांवरुन कॉपी करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर राधेचा पोस्टर पाहून हा देखील कॉपीच असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अवश्य पाहा - बॉयफ्रेंड अर्जूनसोबत ऑनस्क्रीन झळकणार मलायका; मिळालं कोट्यवधींचं मानधन

सलमनाने ट्वीट करत 'राधे'ची रिलीज डेट जाहीर केली आहे. यासोबतच एक नवीन पोस्टर देखील शेअर केलं आहे. सलमान खानने राधे चित्रपटाचं एक पोस्टर शेअर करताना सांगितलं की , हा चित्रपट 13 मे 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. सलमानने या चित्रपटाच्या नवीन पोस्टरसह सोशल मीडियावर कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'ईदची कमेंटमेंट होती, तर ईदलाच येणार, कारण एकदा का मी कमेंटमेंट केली...'. या कॅप्शनसोबतच सलमान खानने #RadheOn13thMay #2MonthsToRadhe हे हॅशटॅगही वापरले आहेत. सलमान खानच्या या घोषणेनं चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Published by: Mandar Gurav
First published: March 27, 2021, 3:04 PM IST

ताज्या बातम्या