मुंबई 29 एप्रिल : अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतिक्षित ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe : your most wanted bhai) हा चित्रपट लवरकच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटातील ‘सीटी मार’ (siti mar) हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं होतं. त्या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. त्यात सलमान सोबत अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) झळकली होती. तर आता ‘दिल दे दिया’ (Dil de diya) या दुसऱ्या गाण्याचा टिझर प्रदर्शित झाला आहे.
‘दिल दे दिया’ या गाण्यात अभिनेता सलमानसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांन्डिज (Jackline Fernandez) झळकणार आहे. नुकतंच गाण्याचं टिझर लाँच (Dil de diya teaser out) झालं आहे. प्रेक्षकांना आता या गाण्याची उत्सुकता लागली आहे. टिझरमध्ये जॅकलिनच्या काही डान्स स्टेप्स पहायला मिळत आहेत. सलमान आणि जॅकलिनची जबरदस्त केमिस्ट्री या आधीही पाहायला मिळाली होती. ‘किक’ (kick) या चित्रपटात ते एकत्र दिसले होते. ‘हँगओव्हर’ हे त्यांच गाणं विशेष लोकप्रिय ठरलं होतं.
View this post on Instagram
यानंतर पुन्हा एकदा सलमान - जॅकलिन एकत्र झळकत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. गायक, संगीतकार हिमेश रेशमिया (Himesh Reshmiya) याने या गाण्याला संगीत दिलं असून शब्बीर अहमद याचे गीतकार आहेत. हे गाणे कमाल खान आणि पायल देव यांनी गायलं आहे. तर नृत्यदिग्दर्शिका शबीना खानने कोरिओग्राफी केली आहे.
(वाचा - ‘साधा नाही तो फार लबाड आहे’; गोविंदानं केली करण जोहरची पोलखोल)
चित्रपटात सलमान खानसोबत दिशा पटानी, रणदीप हुडा (Rnadeep Hooda) आणि जॅकी श्रॉफ (Jacky Shroff) यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्सने झी स्टूडियोसोबत मिळून केली आहे. सलमान खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रॉडक्शन प्राइवेट लिमिटेडद्वारे निर्मित हा चित्रपट या वर्षी ईदला म्हणजेच 13 मेला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 'पे-पर-व्यू' सर्विसवर झी प्लेक्सवर (zee plex) देखील पाहता येईल. तसंच जगभरात विविध प्लॅटफॉर्म्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Salman khan