सलमान झाला चित्रकलेतील मास्टर; मिळालं भारतातील महान कलाकारांमध्ये स्थान

सलमान झाला चित्रकलेतील मास्टर; मिळालं भारतातील महान कलाकारांमध्ये स्थान

सलमान खान आता केवळ हौशी कलाकार राहीलेला नाही. त्याची तुलना आता चक्क देशातील सर्वोत्कृष्ट चित्रकारांशी केली जात आहे. होय, भाईजाननं काढलेल्या चित्रांना देशातील महान चित्रकारांच्या पंक्तीत स्थान मिळालं आहे.

  • Share this:

मुंबई 28 फेब्रुवारी : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) याला अभिनय आणि गाण्यांसोबतच चित्रकलेची देखील आवड आहे. रिकाम्या वेळात तो चित्रकलेचा छंद जोपासतो. त्याने काढलेल्या चित्रांचे फोटो तो अनेकदा सोशल मीडियावर देखील शेअर करतो. मात्र सलमान खान आता केवळ हौशी कलाकार राहीलेला नाही. त्याची तुलना आता चक्क देशातील सर्वोत्कृष्ट चित्रकारांशी केली जात आहे. होय, भाईजाननं काढलेल्या चित्रांना देशातील महान चित्रकारांच्या पंक्तीत स्थान मिळालं आहे. (Salman Khan's painting to be displayed with Raja Ravi Varma)

अलिकडेच बंगळुरु येथील कलादालनात चित्रकलेचं एक भव्य प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनात राजा रवी वर्मा, अबनिंद्रनाथ टागोर, व्ही.एस. गायतोंडे, सावळाराम लक्ष्मण हळदणकर, अमृता शेरगिल यांसारख्या अनेक प्रतिष्ठित चित्रकारांची चित्र ठेवण्यात आली होती. लक्षवेधी बाब म्हणजे या महान चित्रकारांच्या पंक्तित सलमान खान याची देखील काही चित्र ठेवण्यात आली होती. सलमाननं एक ट्विटद्वारे ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली.

प्रियांकानं घेतला निकसोबत घटस्फोट? त्या ट्विटमुळं देसी गर्ल संतापली

राजा रवि वर्मा, अबनिंद्रनाथ टागोर, व्ही.एस. गायतोंडे यांसारख्या महान चित्रकारांच्या पंक्तीत माझीं चित्र देखील झळकणार हे ऐकून प्रचंड आनंद झाला. हा सन्मान दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. अशा आशयाचं ट्विट करुन सलमाननं आपला आनंद व्यक्त केला. हे प्रदर्शन २७ फेब्रुवारी ते १० मार्चपर्यंत भरवण्यात आलं आहे.

Published by: Mandar Gurav
First published: February 28, 2021, 3:18 PM IST

ताज्या बातम्या