सलमानची 'बिईंग ह्युमन' संस्था ब्लॅक लिस्टमध्ये ?, मुंबई पालिकेकडून नोटीस

सलमानची 'बिईंग ह्युमन' संस्था ब्लॅक लिस्टमध्ये ?, मुंबई पालिकेकडून नोटीस

संस्थेतर्फे हे सेंटर अद्याप सुरू करण्यात आलं नाही, त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

  • Share this:

16 फेब्रुवारी : मुंबई महापालिकेने अभिनेता सलमान खानच्या 'बिईंग ह्युमन' या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची तयारी केल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. प्रकल्प मंजूर झाल्यानंतरही वर्षभरात वांद्रे इथं सवलतीच्या दरातील डायलिसिस युनिट न बसवल्याने ही कारवाई करण्यात येणार असल्याचं समजतंय.

महापालिकेने सलमान खानच्या 'बिईंग ह्युमन' संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावलीये. दर महिन्याला १० हजार डायलिसिस प्रक्रिया पार पाडण्यासाठी महापालिकेने डिसेंबर २०१६ मध्ये १२ डायलिसिस सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

मुंबई पालिका आणि बिईंग ह्युमन यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार, पालिका सेंटरसाठी जागा पुरवणार होती, आणि सलमानची संस्था या सेंटरमध्ये कर्मचारी आणि सोयीसुविधा पुरवणार होती.

मात्र, संस्थेतर्फे हे सेंटर अद्याप सुरू करण्यात आलं नाही, त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान या प्रकरणी बिईंग ह्युमन या संस्थेची प्रतिक्रिया प्रतिक्षित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2018 11:23 PM IST

ताज्या बातम्या