S M L

सलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द

यापूर्वीही दबंग टूरचा नेपाळ दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र तेव्हा या टूरमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांना एका स्थानिक संघटनेने धमकी दिली होती. त्यामुळे तेव्हा हा दौरा रद्द करावा लागला होता.

Sonali Deshpande | Updated On: May 27, 2018 12:47 PM IST

सलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द

मुंबई, 27 मे : सलमान खानच्या दबंग टूरचा नेपाळ दौरा दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आलाय. हा दौरा पुढे ढकलण्यासाठी सलमान खानच्या तारखा  नसल्याचं कारण पुढे करण्यात आलंय. यापूर्वीही दबंग टूरचा नेपाळ दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र तेव्हा या टूरमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांना एका स्थानिक संघटनेने धमकी दिली होती. त्यामुळे तेव्हा हा दौरा रद्द करावा लागला होता.

त्यानंतर पुन्हा हा दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सोनाक्षी सिन्हा, कृती सनोन, प्रभुदेवा, डेझी शहा, मनीष पॉल यांचा या दौऱ्यात सहभाग होता. मात्र पुन्हा एकदा तो पुढे ढकलण्यात आल्याने तो कधी होणार याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 27, 2018 12:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close