S M L

सलमानच्या 'ट्युबलाइट'चं पोस्टर आणि टिझर रिलीज

या पोस्टरवर ईदच्या मोक्यावर सिनेमा रिलीज करण्याची वेळ दिली आहे.

Sonali Deshpande | Updated On: Apr 19, 2017 02:17 PM IST

सलमानच्या 'ट्युबलाइट'चं पोस्टर आणि टिझर रिलीज

19 एप्रिल : बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक खुश खबर आहे. सलमानच्या बहुप्रतीक्षित ट्युबलाइट सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलंय. सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुद्धा चालू झालंय.

'क्या तुम्हे यकिन है' असं सलमानने सोशल मीडिया पोस्टर शेअर करताना लिहिलंय. तसंच या पोस्टरवर ईदच्या मोक्यावर सिनेमा रिलीज करण्याची वेळ दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून सलमानचा प्रत्येक सिनेमा ईदच्या दिवशी रिलीज तर होतोच पण रेकॉर्ड ब्रेक कमाई सुद्धा करतो.

या पोस्टरमध्ये सलमानने कोट आणि टोपी घातली आहे. 'ट्युबलाइट'मध्ये सलमानसोबत चिनी अभिनेत्री आहे.

सलमानच्या या आगामी सिनेमाचं टिझरसुद्धा सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलंय.

ट्युबलाइट सिनेमाच दिग्दर्शन सलमानचे आवडते दिग्दर्शक कबीर खान यांनी केलंय. सलमान आणि कबीर यांच्यामध्ये या सिनेमामुळे मतभेद झाले असल्याच्या चर्चा सुद्धा मीडियामध्ये रंगल्या होत्या. मात्र अशा प्रकारची कोणतीच नाराजी नसल्याचं कबीरने म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2017 02:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close