S M L
Football World Cup 2018

जल जा...जल जा...आला 'ट्युबलाईट'चा टीझर

"यकीन एक ट्युबलाईट के तरहा होता है, जब ये जलता हे तो फुल लाईट कर देता है"

Sachin Salve | Updated On: May 4, 2017 10:57 PM IST

जल जा...जल जा...आला 'ट्युबलाईट'चा टीझर

04 मे : "यकीन एक ट्युबलाईट के तरहा होता है, जब ये जलता हे तो फुल लाईट कर देता है" असं म्हणत दबंग खान अर्थात सलमान खानच्या 'ट्युबलाईट'चा बहुप्रतिक्षित टीझर अखेर प्रसिद्ध झालाय.

ईद आणि सलमान खानचा सिनेमा हे आता समिकरण झालंय. त्यामुळेच या ईदलाही सलमान खान ट्युबलाईट घेऊन येतोय.

पोस्टरबाजी झाल्यानंतर अखेर ठरल्याप्रमाणे आज या सिनेमाचा टीझर प्रसिद्ध झाला.

या टीझरमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाचे चित्रण दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे 'मैने प्यार क्यु किया'नंतर सोहल खानही यात दिसलाय. नेहमीच्या हटके अंदाजात असणाऱ्या सलमानचं वेगळं रुप या सिनेमात पाहण्यास मिळणार हे ट्रेलरवरुन निश्चित झालंय. येत्या ईदला हा सिनेमा रिलीज होईल तोपर्यंत तुम्ही या टीझरचा आनंद घ्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 4, 2017 10:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close