• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • सलमान आणि शेराची भेट कशी झाली? बॉडिगार्डनं सांगितला 22 वर्षांचा प्रवास

सलमान आणि शेराची भेट कशी झाली? बॉडिगार्डनं सांगितला 22 वर्षांचा प्रवास

शेरा सलमान खानच्या खास व्यक्तींमध्ये कसा गणला जाऊ लागला याची उत्सुकता सलमान खानच्या फॅन्ससह सर्वसामान्य नागरिकांना आहे. याबाबत एका मुलाखतीत शेरानं या सर्व बाबी स्पष्ट केल्या आहेत.

 • Share this:
  मुंबई 10 मे: सलमान खान (Salman Khan)हे बॉलिवूडमधील (Bollywood)एक वलयांकित नाव. अनेक समारंभ,शोतसंच अवॉर्ड फंक्शन्समध्ये सलमान खानसोबत सावलीसारखी असणारी व्यक्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेते. पिळदार शरीरयष्टी,भेदक नजर आणि उंचंपुरंव्यक्तिमत्व असलेला शेरा (Shera)गेली अनेक वर्ष सलमान खानच्या अत्यंत जवळचा विश्वासू आणि त्याचा बॉडीगार्ड (Bodyguard)म्हणून काम करतो. शेरा आणि सलमान खानची भेट कशी झाली. अल्पावधीतच तो सलमान खानच्या खास व्यक्तींमध्ये कसा गणला जाऊ लागला याची उत्सुकता सलमान खानच्या फॅन्ससह सर्वसामान्य नागरिकांना आहे. याबाबत एका मुलाखतीत शेरानं या सर्व बाबी स्पष्ट केल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा वैयक्तिक बॉडीगार्ड शेराची गेल्या 20 वर्षांपासून अनेक बॉलिवूड सुपरस्टार्सशी (Bollywood Superstars)जवळीक आहे. नुकत्याच एका मुलाखतीत शेराने 1999 मध्ये त्याची आणि सलमान खानची पहिली भेट कशी झाली, तसेच सलमान बरोबरच्या अन्य काही आठवणींना उजाळा दिला. या चिमुरड्यांना ओळखलं का? तुमच्या आवडत्या मराठी अभिनेत्री बालपणी दिसायच्या अशा शेरानं सांगितलं की मी हॉलीवूड सिंगर व्हिगफिल्ड हिच्या कार्यक्रमाच्या सुरक्षेचं नियोजन हाताळत होतो. तेव्हा मी आणि सलमान खान प्रथम भेटलो. त्यानंतर हॉलिवूड अभिनेता किआनो रिव्ह्ज भारतात आला होता,त्या कार्यक्रमात माझी आणि सलमानची परत भेट झाली. त्यावेळी किआनो स्पीड (Speed) हा चित्रपट रिलीज झाला होता आणि मॅट्रिक्स (Matrix)हा रिलीज होण्याच्या मार्गावर होता. सलमान खानसोबत पहिला शो मी चंदीगडमध्ये केला. त्यानंतर आजपर्यंत आम्ही दोघं एकत्र आहोत. केनू 1999 मध्ये भारतात आला होता. त्यावेळी त्याने झी सिने अवॉर्डला हजेरी लावली होती. सोल्जर या हिंदी चित्रपटासाठी डेब्यू अवॉर्ड त्याच्या हस्ते प्रिती झिंटाला (Priety Zinta)प्रदान करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्याने कुर्ता-पायजमा परिधान केल्याचे व्हिडीओत दिसते,असं एका वेबसाईटने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. सलमान खान माझ्या मुलाला देखील लॉन्च करण्याच्या विचारात आहे,असं यावेळी शेरानं सांगितलं. कोरोना संसर्गामुळे (Corona)निर्माण झालेली सद्यःस्थिती सुधारल्यानंतर याबाबतची घोषणा करण्यात येईल,असं शेरानं यावेळी स्पष्ट केलं. सध्या सिनेमाचा विचार करता,सलमान खानचा राधे (Radhe)हा चित्रपट 13 मे रोजी विविध प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. यामध्ये सलमानची को-स्टार दिशा पटनी असून,जॅकी श्रॉफ,रणदिप हुडा आणि मराठमोळा अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडे देखील या सिनेमात भुमिका बजावत आहेत. हा चित्रपट मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट मुळशी पॅटर्न चा रिमेक आहे.
  First published: