काळवीट शिकार- सलमान खानला धक्का, जोधपूर न्यायालयात हजर राहिला नाही तर जामीन होणार रद्द

काळवीट शिकार- सलमान खानला धक्का, जोधपूर न्यायालयात हजर राहिला नाही तर जामीन होणार रद्द

अनेकवेळा सांगूनही न्यायालयात गैरहजर राहिल्यानंतर न्यायालयाने त्याची चांगलीच कानउघडणी केली होती.

  • Share this:

मुंबई, 04 जुलै- काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खानला गुरुवारी न्यायालयाने मोठा धक्का दिला. सलमानला ४ जुलैला न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्याचा वकील हस्तीमल सारस्वत यांनी तो हजर राहू शकत नसल्याचं सांगितलं. सलमानच्या या गोष्टीवर न्यायालयाने आक्षेप घेत त्याला फटकारलं. तसेच दिलेल्या तारखेला हजर का राहिला नाही असा प्रश्नही विचारला. तसेच पुढच्या तारखेला जर सलमान हजर राहिला नाही तर त्याचा जामीन रद्द करण्यात येईल अशी ताकीद सलमानच्या वकिलाला देण्यात आली. या प्रकरणी सीजेएम ग्रामीण न्यायालयाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. यावर सलमानने अपील केल्यानंतर जोधपुरच्या जिल्हा आणि सेशन न्यायालात सुनावणी करण्यात आली.

‘तारक मेहता’ मध्ये दिसणार नवीन दयाबेन, दिशा वकानीला या अभिनेत्रीने केले रिप्लेस

अनेकवेळा सांगूनही न्यायालयात गैरहजर राहिल्यानंतर न्यायालयाने त्याची चांगलीच कानउघडणी केली होती. तसेच याआधीच्या सुनावणीत सलमान अनेक काळापासून न्यायालयात गैरहजर राहत आहेत. त्यामुळे शक्य झालं तर पुढच्या तारखेला त्याला हजर राहण्यास सांगा असं न्यायालयाने ताकीद दिली होती. मात्र सलमानचा वकील निशांत बोडाने गुरुवारला सलमान गैरहजर राहिल्याबद्दल पुन्हा न्यायालयाची माफी मागितली.

दोन दशकांपासून सुरू आहे सलमान खानवर खटला-

सलमानच्या विरोधात जोधपुरच्या वेगवेगळ्या  न्यायालयात गेल्या दोन दशकांपासून अनेक केस सुरू आहेत. सलमानचा गेल्या २० वर्षांचा रेकॉर्ड पाहिला असता जेव्हा जेव्हा न्यायालयाने त्याला अंतिम समन्स दिला, तेव्हा तो न्यायालयात हजर राहिला आहे. त्यामुळे यावेळी गुरुवारी न्यायालयाने त्याला हजर राहण्यास सांगितले होते तेव्हा तो हजर राहिल असं सर्वांना वाटत होतं. पण प्रत्यक्षात मात्र असं काही झालं नाही.

सनी लिओनीला झाला हा आजार, म्हणून सिनेमाच्या सेटवर नेहमी पोहोचते उशिरा

SPECIAL REPORT: अभिनेत्री भाग्यश्री दासानीच्या पतीला मुंबई पोलिसांकडून अटक

First Published: Jul 4, 2019 01:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading