मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कोण आहे 'Antim'फेम महिमा मकवाना? सलमान खानच्या चित्रपटातून करतेय बॉलिवूडमध्ये पदार्पण

कोण आहे 'Antim'फेम महिमा मकवाना? सलमान खानच्या चित्रपटातून करतेय बॉलिवूडमध्ये पदार्पण

सलमान खानच्या(Salman Khan) 'अंतिम: द फायनल ट्रुथ'(Antim: The Finel Truth) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

सलमान खानच्या(Salman Khan) 'अंतिम: द फायनल ट्रुथ'(Antim: The Finel Truth) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

सलमान खानच्या(Salman Khan) 'अंतिम: द फायनल ट्रुथ'(Antim: The Finel Truth) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,27ऑक्टोबर- सलमान खानच्या(Salman Khan) 'अंतिम: द फायनल ट्रुथ'(Antim: The Finel Truth) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात आयुष शर्माही पहिल्यांदाच सलमानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सलमान खानचा जबरदस्त लूक दाखवण्यात आला आहे. जो चाहत्यांना खूप आवडला आहे. या चित्रपटात आयुष शर्मा पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात आयुष शर्मासोबत महिमा मकवाना (Mahima Makwana) ही अभिनेत्री दिसणार आहे. महिमा मकवाना या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

अलीकडेच महिमा मकवाना हिने हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सलमान खानसोबत काम करतानाचा अनुभव शेअर केला आहे. महिमा मकवानाने सलमान खानचं प्रचंड कौतुक केलं आहे. ती म्हणाली, 'सलमान खानचं व्यक्तिमत्त्व विलक्षण आहे. पण मी माझ्या कामगिरीवर कुणालाही वरचढ होऊ दिलं नाही. कामाचा दबाव मी जबाबदारीने घेतला आणि बाहेरच्या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होऊ दिला नाही. मी माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं आहे.

'अंतिम' हा चित्रपट तिच्या स्वप्नातील पदार्पण आहे, असं महिमाचं मत आहे. ती म्हणाली, 'एवढ्या मोठ्या चित्रपटात मला संधी मिळणार नाही असं वाटलं होतं , पण मी माझा आत्मविश्वास वाढवला आणि जे होईल ते बघू म्हणत या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं.'तिने सांगितले की, महेश मांजरेकर ऑडिशन घेत होते आणि त्याच दिवशी मला या भूमिकेसाठी फायनल करण्यात आल. महिमा मकवानाने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. महिमा कलर्सच्या लोकप्रिय शो बालिका वधूमध्येदिसली आहे. 'मोहे रंग दे' या मालिकेतून त्याला खरी ओळख मिळाली.मात्र झी टीव्हीवरील 'सपने सुहाने लडकपणके' या मालिकेतू तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

(हे वाचा:महेश मांजरेकरांनी कॅन्सरशी लढा देत केली Antim ची शूटिंग;सलमानने ... )

त्याचबरोबर या चित्रपटात सलमान खानसोबत आयुष शर्मा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्यासाठीही हे आव्हानापेक्षा कमी नाही. तथापि, ट्रेलर पाहून असे म्हणता येईल की आयुष शर्मा त्याच्या भूमिकेत चांगला आहे आणि चित्रपटात सलमानला खुले आव्हानही देताना दिसत आहे.चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगायचे तर, या चित्रपटात, सलमान खान एका पोलिसाच्या भूमिकेत आहे. तो सरदारच्या भूमिकेत आहे. तर आयुष एका दमदार खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलर पाहून कळत आहे की यावेळी या दोघांची जोडी थिएटरमध्ये धमाका करणार आहे. 'अंतिम: द फायनल ट्रुथ' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि 26 नोव्हेंबर 2021 रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखल होण्यासाठी सज्ज आहे.

First published:

Tags: Entertainment, Salman khan