मुंबई, 29 नोव्हेंबर: सलमान खान आणि आयुष शर्मा (Salman Khan & Ayush Sharma) यांचा 'अंतिम - द फायनल ट्रुथ' (Antim- The Final Truth )हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटात सलमान खान एका शीख पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. लोक सलमान-आयुषच्या कामाचे कौतुकही करत आहेत. दरम्यान, सलमान खानचा एक व्हिडिओ (Salman Khan Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.व्हिडिओमध्ये बॉलीवूडचे दबंग हिरो वेगळ्या अंदाजात दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की भाईजानने त्याच्या टी-शर्टला त्याचं मास्क कसा बनवलं आहे.
हा व्हिडिओ पापाराझी व्हायरल भयानीने त्याच्या अधिकृत इन्स्टा हँडलवर शेअर केला आहे. सलमान खान मेहबूब स्टुडिओबाहेर दिसला. जेव्हा तो स्टुडिओतून बाहेर पडणार होता तेव्हा त्याला जाणवले की बाहेर मीडियाचे कॅमेरे आपली वाट पाहत आहेत, त्यामुळे स्टुडिओतून बाहेर पडताना त्याने टी-शर्टने तोंड झाकले. त्यानंतर त्यांनी मीडियासमोर पोज देखील दिली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताच व्हायरल झाला. सलमानची ही शैली लोकांना खूप आवडली. त्यांच्या आवडत्या स्टारच्या या व्हिडिओवर चाहते मजेशीर कमेंट करत आहेत.
वाचा : VIDEO : कतरिनाच्या आईचा शॉपिंग करताना पडला फोन, लोकांनी काढला भलताच अर्थ
या व्हिडिओमध्ये सलमान खान खूपच हॅडसम दिसत आहे. त्याला पाहून असे वाटले की तो अजूनही 30 वर्षांचा आहे. त्याने त्याचे वाढते वय दिसत नाही. त्याच्या या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, 'सलमानने अमृत प्यायले आहे, त्याचं वय उलटं बाजूने वाढतंय' तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की, कोणत्या चक्कीचा हा आटा खातो, 20 वर्षाच्या तरूणाला देखील सलमना कॉम्प्लेक्स देऊ शकतो. तर एका चाहत्याने म्हटलं आहे की, सलमान दिवसेंदिवस तरूण होत आहे.
वाचा : चाहत्यांचे 'ते' कृत्य पाहून बॉलिवूडचा 'भाईजान' Salman Khan भडकला, म्हणाला...
सलमान-आयुष शर्माचा 'अंतिम' हा चित्रपट 26 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाची कमाई अपेक्षेप्रमाणे खूपच कमी होती. पण आठवड्याच्या शेवटी चित्रपटाचा व्यवसाय तेजीत आला. तसे, सलमानच्या चाहत्यांना त्याचे काम आवडले. काही चाहत्यांनी थिएटरमध्ये फटाकेही फोडल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु अभिनेत्याने चाहत्यांना तसे न करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर सलमान अजूनही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
View this post on Instagram
सलमान खानचे एकापाठोपाठ एक असे पाच चित्रपट आहेत, जे येत्या दोन वर्षांत प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये अनेक चित्रपटांचे शूटिंग संपले आहे, तर अनेक चित्रपट सुरू आहेत. त्याचा बहुप्रतिक्षित 'टायगर 3' चित्रपटाचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले आहे. त्यानंतर या चित्रपटाचे पॅकअप लवकरच होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Salman khan