मुंबई,25 मे- बॉलिवूड भाईजान सलमान खानला गेल्या अनेक दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेत आणखीन वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या सुरक्षतेची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. अभिनेत्याचे बॉडीगार्ड्स नेहमीच सतर्क असतात. दरम्यान आता सलमान खानचा एक एयरपोर्टवरील व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्याला इतक्या लोकांच्या गर्दीत असं काही दिसलं जे त्याच्या बॉडीगार्ड्सनासुद्धा पाहता आलं नाही. या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
सलमान खानला त्याच्या दिलखुलास व्यक्तिमत्वासाठी ओळखलं जातं. सलमान खानचं मन खूप मोठं आहे असं अनुभव घेणारे अनेकजण म्हणत असतात.तसेच सलमान खान आपल्या चाहत्यांना नेहमीच आदराने आणि प्रेमाने हॅन्डल करत असतो. बॉलिवूडचा भाईजान आपल्या चिमुकल्या चाहत्यांवर तर जीव ओवाळून टाकतो. अशातच आता सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून सोशल मीडियावर अभिनेत्याचं प्रचंड कौतुक होत आहे.
(हे वाचा:Shubman-Sara: IPL 2023 दरम्यान शुभमन-साराचा Breakup? या गोष्टीमुळे रंगली चर्चा )
नुकतंच पापाराझी विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सलमान खान एयरपोर्टवर असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान एयरपोर्टवरुन चालत येत असल्याचं दिसून येत आहे. सलमान खानच्या आजूबाजूला त्याचे बॉडीगार्ड्ससुद्धा आहेत. सोबतच अभिनेत्याला पाहण्यासाठी गर्दीही दिसून येत आहे. बॉडीगार्ड्स अभिनेत्याला सुरक्षित बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
View this post on Instagram
अशातच सलमान खान चालता-चालता मध्येच थांबतो. आणि गर्दीकडे बघून हात करु लागतो. बॉडीगार्ड्ससुद्धा चकित होऊन पाहू लागतात. तर या गर्दीमधून पळत एक छोटा मुलगा समोर येतो. आणि तो येऊन सलमान खानला मिठी मारतो असं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.सलमान खान त्याच्यासोबत काहीतरी संवाद साधतानाही दिसत आहे. त्या मुलाच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसून येत आहे.
हा व्हिडीओ पाहून नेटकरी सलमान खानचं कौतुक करत आहेत. सलमान खान खूपच दयाळू आणि चाहत्यांना आदर देणारा अभिनेता असल्याचं म्हणत आहेत. शिवाय इतक्या गर्दीत बॉडीगार्ड्सनी त्या चिमुकल्याला पाहिलं नाही. पण सलमान खानने अचूक हेरलं असं म्हणत चाहते त्याचं कौतुक करत आहेत. कामाबाबत सांगायचं तर सलमान खान लवकरच कतरीना कैफसोबत 'टायगर ३'मध्ये झळकणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Life18, News18 Lokmat, Salman khan