Home /News /entertainment /

हे फक्त सलमान खानच करू शकतो; फार्म हाऊसवरचा हा VIDEO होतोय VIRAL

हे फक्त सलमान खानच करू शकतो; फार्म हाऊसवरचा हा VIDEO होतोय VIRAL

सलमान कामाव्यतिरिक्त त्याचा निवांत वेळ त्याच्या मुंबई पासून जवळच असलेल्या फार्म हाऊसवर घालवत असतो.

  मुंबई 12 ऑगस्ट : बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) निरनिराळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. आता तर तो आपल्या घोड्याला चारा घातल्यामुळे ही चर्चेत आला आहे. सलमान कामाव्यतिरिक्त त्याचा निवांत वेळ त्याच्या मुंबई पासून जवळच असलेल्या फार्म हाऊसवर घालवत असतो. पनवेलला सलमानच आलिशान फार्म हाऊस (Salman Khan Farmhouse) आहे. लॉकडाउन मधील अधिक काळ त्याने फार्म हाऊसवर घालवला होता. सलमानच्या फार्म हाऊसवर घोडे ही आहेत. या घोड्यांसोबत त्याने एक गाणं ही शूट केलं होतं. तर तेथील परिसरात तो घोड्यावरून फेरफटका ही मारतो. व्हिडीओत तो आपल्या लाडक्या घोड्याला चारा देत आहे, तो ही चक्क गवत डोक्यावर टाकून. सलमानचा हा मजेशीर व्हिडिओ फारच व्हायरल होत आहे.
  सलमान आपल्या फार्म हाऊसवर अनेक ॲक्टिविटीज करत असतो. मागील लॉकडाऊन दरम्यान त्याने 2 गाणी तिथे शूट केली होती. याशिवाय त्याने गाणी गायली देखील होती. सध्या सलमान त्याच्या आगामी चित्रपटांत व्यस्त आहे. त्यामुळे हा व्हिडिओ देखील लॉकडाउन दरम्यानचा असावा असं म्हटल जात आहे. रेखा यांची जादू कायम! मालिकेतील 1 मिनिटाच्या कॅमिओसाठी घेतलं इतकं मानधन; आकडा वाचूनच व्हाल थक्क यावर्षी सलमानचा राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटगृह बंद असल्याने सलमानचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करावा लागला होता. त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षकांना प्रतिक्षा आहे.

  HBD Sara Ali Khan: म्हणून सारा वडील सैफ आणि करीनापासून राहते दूर; सांगितलं हे कारण

  याशिवाय नुकताच सलमान ऑलिम्पिक सिल्व्हर मेडलिस्ट (Olympic silver medalist) मीराबाई चानु (Mirabai Chanu) हिला भेटला. तसेच तिचं अभिनंदन करत तिला सदिच्छा भेट ही दिली. त्यामुळे पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. सलमान ‘अंतिम’ (Antim), ‘टायगर 3’ (Tiger 3) या चित्रपटांत व्यस्त आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood actor, Entertainment, Salman khan

  पुढील बातम्या