Home /News /entertainment /

आरारारा खतरनाक ! मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक; दबंग खान झळकणार मुख्य भूमिकेत

आरारारा खतरनाक ! मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक; दबंग खान झळकणार मुख्य भूमिकेत

अभिनेता सलमान खान (Salman Khan)लाही मराठी सिनेमाची भुरळ पडली आहे. मुळशी पॅटर्न (Mulshi pattern) या सुपरहिट सिनेमाचा हिंदी रिमेक सलमान करणार आहे. लवकरच सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल.

    मुंबई, 29 ऑक्टोबर: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan)ला सुद्धा मराठी सिनेमाची भुरळ पडली आहे. राधे: यूअर मोस्ट वॉटेंड भाई (Radhe: Your Most Wanted Bhai) सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सल्लू आता नव्या सिनेमाच्या तयारीला लागला आहे. मुळशी पॅटर्न (Mulshi Pattern) या सुपरहिट हिंदी सिनेमाचा हिंदीत रिमेक होणार आहे. अंतिम असं हिंदी सिनेमाचं नाव असेल. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. अंतिम या सिनेमामध्ये सलमान खान पुन्हा एकदा पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.राधे सिनेमाच्या शूटिंगनंतर टायगर जिंदा है च्या तिसऱ्या भागाचं शूटिंग  सुरू होणार होतं. पण काही कारणांमुळे ते पुढे ढकल्यात आलं आहे. अंतिम सिनेमाचं शूटिंग पूर्ण करुन फेब्रुवारीच्या दरम्यान सलमान टायगर जिंदा है च्या तिसऱ्या भागाचं शूटिंग सुरू करणार आहे. जबरदस्त अक्शन, ड्रामा, कलाकारांचा उत्तम अभिनय आणि कथेला साजेसं दिग्दर्शन यामुळे मुळशी पॅटर्न हा सिनेमा मराठीत हिट झाला होता. मराठीत उपेंद्र लिमयेने साकारलेला पोलीस सलमान खान हिंदीत साकारणार आहे. मुळशी पॅटर्नच्या हिंदी रिमेकचं नाव आधी ‘गन्स ऑफ नॉर्थ’ ठेवण्यात आलं होतं त्यानंतर अंतिम नाव ठवरण्यात आलं. सलमान खानचा मेव्हणा आयुष शर्मा या सिनेमात नकारात्मक भूमिका करणार आहे. ‘गन्स ऑफ नॉर्थ’ हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि उडिया या पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा रिलीझ करण्यात येणार आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Bollywood, Salman khan

    पुढील बातम्या