भाऊ, एक्स वहिनी, एक्स गर्लफ्रेंड, गर्लफ्रेंडची बहीण; कोणाकोणाची मदत करणार सलमान

भाऊ, एक्स वहिनी, एक्स गर्लफ्रेंड, गर्लफ्रेंडची बहीण; कोणाकोणाची मदत करणार सलमान

सोशल मीडियावर सध्या सलमानच्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट पाहायला मिळत आहेत.

  • Share this:

मुंबई, 04 ऑगस्ट- सलमान खानचं करिअर सध्या तेजीत आहे. ज्या सिनेमात काम करेल तो सिनेमा हिट होत आहे. असं असलं तरी त्याच्या प्रोडक्शनची निर्मिती असलेले सिनेमे मात्र बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटत आहेत. नोटबुक, लवयात्री हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांचं मन जिंकू शकले नाही. लवयात्री सिनेमातून सलमानने बहिणीच्या नवऱ्याला अर्थात आयुष शर्माला हिट करण्याचा तुफान प्रयत्न केला, पण त्याला फारसं यश मिळालं नाही.

दुसरीकडे बॉलिवूडमध्ये आपलं स्थान पक्क केलेली अभिनेत्री कतरिना कैफची बहीण इजाबेल कैफही सिनेसृष्टीत पदार्पण करायला सज्ज झाली आहे. इजाबेलला हिट करण्यासाठी सलमान आणि कतरिना कोणतीही कमतरता सोडत नाहीये. इजाबेल आणि आयुष्मान खुराना क्वथा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सोशल मीडियावर सध्या सलमानच्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट पाहायला मिळत आहेत. एका युझरने लिहिले की, भाऊ, एक्स गर्लफ्रेण्ड, भाऊजी, एक्स वहिनी, एक्स गर्लफ्रेण्डची बहीण सर्वांचं करिअर भाईच उभं करणार. तर दुसऱ्या एका युझरने लिहिले की, भाई हा सिनेमा सुपर फ्लॉप होणार आहे. अजून एका युझरने लिहिले की, भाई कशाला स्वतःचा पैसा व्यर्थ घालवतोस.

सोशल मीडियावर यावरून वेगवेगळे मीम व्हायरल होत आहेत. सलमानचे चाहते त्याला आयुषसाठी सिनेमा न करण्याचा सल्ला देत आहेत. सोशल मीडियावर असंही म्हटलं जातं की सलमानचं बहिणीवर अर्थात अर्पिता खानवर जीवापाड प्रेम आहे. तिच्यासाठी सलमान आयुषला री-लॉन्च करणार आहे.

क्वथा या सिनेमातून एका लष्कर अधिकाऱ्याची सत्य घटना दाखवण्यात येणार आहे. याचं बहुतांशी चित्रीकरण हे मणिपुरमध्ये होणार आहे. करण बूटानी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून सिनेमाची निर्मिती कतरिना कैफ करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

या बॉलिवूड अभिनेत्याने ‘जंगला’त केलं न्यूड फोटोशूट, ज्वाला गुट्टाने बंद केले डोळ

पावसाचा फटका मालिकांनाही, रात्रीस खेळ चाले मालिकेचं चित्रीकरण थांबलं

मानसिक आजाराने त्रस्त गोविंदा? जवळच्या मित्राने केला खुलासा

काजोलपासून जेनेलियापर्यंतच्या 5 आई, ज्यांनी मुलांसाठी करिअर सोडलं..

VIDEO: मालाडमध्ये घरात गुडघ्याभर पाणी, नागरिकांचे हाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 4, 2019 07:02 PM IST

ताज्या बातम्या