...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर

प्रोड्युसर साजिद नाडियावालानं सलमानच्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2019 02:46 PM IST

...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर

मुंबई, 22 ऑक्टोबर : सलमान खानच्या लग्नाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. आतापर्यंत सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे. पण कोणत्याही मुलाखतीत किंवा फंक्शनमध्ये लग्नाबद्दल विचारलं तर सलमान हा विषय नेहमीच टाळताना दिसतो. त्यामुळे सलमानच्या लग्नाचा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’ आहे. सलमान अजूनही लग्न का करत नाही हे चाहत्यांसाठी न उलगडलेलं कोडंच आहे. पण आता प्रोड्युसर साजिद नाडियावालानं सलमानच्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे.

नुकतंच हाऊसपुल 4 सिनेमाच्या प्रमोशनसाठी द कपिल शर्मा शोमध्ये पोहोचलेल्या साजिदनं सलमानच्या लग्नाविषयी सांगितलं, सलमान आणि मी एकाच दिवशी लग्न करणार होतो. त्याच्याकडे मुलगी होती. मला शोधावी लागली. दोघांच्याही लग्नाच्या पत्रिका छापल्या गेल्या. मात्र अचानक काही असं घडलं ज्यामुळे त्याचं लग्न मोडलं. नंतर माझ्या लग्नाच्या वेळी तो स्टेजवर आला आणि म्हणाला, मागे गाडी उभी आहे पळ लवकर. पण मी असं करु शकलो नाही.

समद्या गावाला झालिया लग्नाची घाई! रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL

Loading...

 

View this post on Instagram

 

Hasi ki patakhe fatenge aaj #Housefull4 ke cast ke saath #TheKapilSharmaShow pe, raat 9:30 baje sirf Sony par @kapilsharma @kikusharda @chandanprabhakar @krushna30 @bharti.laughterqueen @sumonachakravarti @banijayasia @archanapuransingh @akshaykumar @kritisanon @iambobbydeol @kriti.kharbanda @riteishd @hegdepooja

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial) on

सजिदनं अगोदर दिव्या भारतीशी लग्न केलं होतं. पण लग्नाच्या काही दिवसांनंतर दिव्याचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला. त्यानंतर 2000 मध्ये साजिदनं वर्धा खानशी लग्न केलं. वर्धा पत्रकार होती आणि ती दिव्या भारतीच्या मृत्यूवर स्टोरी करत होती. दरम्यान या दोघांची ओळख झाली आणि नंतर या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं.

अमिताभ यांच्या मोबाइलमध्ये 'या' नावानं सेव्ह आहे जया बच्चन यांचा नंबर

'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का!

=========================================================

VIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 04:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...